नरेंद्र मोदींचं बाळ ‘जुमला’; राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून प्रहार

मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारवर असलेला राज ठाकरे यांचा रोष काही कमी होण्याचं नाव घेत नाहीये. राज ठाकरे यांनी आपल्या व्यंगचित्राच्या माध्यमातून पुन्हा एकदा मोदींना लक्ष्य केलं आहे. 

नरेंद्र मोदी योजनांचं बाळ घेऊन निघाले आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंहांना ते “कधीतरी आमच्या छकुल्याचंही कौतुक करा”, असं म्हणत आहे. 

दरम्यान, मनमोहन सिंग यांच्या तोंडी राज ठाकरे यांनी टाकलेलं उत्तर मार्मिक आहे. “मोदीजी नक्की केले असते, मात्र त्यात नुसता पेंढा भरलाय”, असं मनमोहन सिंग म्हणताना दिसत आहेत. दरम्यान, अमित शहा यांनाही या व्यंगचित्रात गमतीदार अवस्थेत दाखवण्यात आलं आहे.