मोठ्या सुट्टीनंतर राज ठाकरे पुन्हा सोशल मीडियावर सक्रीय

मुंबई | राज ठाकरे पार्ट टाईम राजकारण करतात अशी टीका त्यांच्यावर कायमच होते. त्यांची हीच पद्धत आता सोशल मीडियाबाबतही दिसून येतेय. सोशल मीडियावर मोठी सुट्टी घेतल्यानंतर राज पुन्हा एकदा सक्रीय झालेत.

यावेळी हज सबसिडीच्या मुद्द्यावरुन त्यांनी मोदी सरकारला लक्ष्य केलंय. आपल्या फेसबुक पेजवर राज ठाकरे यांनी यासंदर्भात एक व्यंगचित्र पोस्ट केलंय. 

राज ठाकरे यांनी मोठं गाजत वाजत सोशल मीडियावर पाऊल ठेवलं होतं. मात्र गेल्या काही दिवसांपासून ते सोशल मीडियावरुन गायब होते. हे त्यांच्या राजकारणाशी सुसंगत आहे, असं आता बोललं जातंय.