“अजित पवार कधीच जातीच्या राजकारणात पडले नाहीत”; राज ठाकरेंचं वक्तव्य

Raj Thackeray | बीड येथे दौऱ्यावर असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ताफ्यावर काही लोकांनी सुपाऱ्या फेकल्या होत्या. यानंतर आज (10 ऑगस्ट) छत्रपती संभाजी नगर येथे बोलताना राज ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांवर जोरदार हल्ला केला. उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे राज्यात जातीय राजकारण करत असून त्यांना मराठवाड्यात दंगली घडवायच्या आहेत, असा आरोपच राज ठाकरेंनी केला आहे. यावेळी त्यांनी (Raj Thackeray ) पहिल्यांदाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजकारणाबाबत भाष्य केलं.

“अजित पवार जेव्हा शरद पवार यांच्या सोबत होते, तेव्हा पवार त्यांचं राजकारण करायचे. पण, मी खात्री लायक सांगतो की, अजित पवार यांनी कधीच जातीचे राजकारण केले नाही. हे खूप निश्चित आहे.माझे अनेक मतभेद असतील, पण त्यांनी जातीच्या बाबतीत असे कोणतेच वक्तव्य केलं नाही.”, असं राज ठाकरे म्हणाले आहेत.

“अजित पवार कधीच जातीबद्दल बोलले नाहीत”

यावेळी राज ठाकरे यांनी आरक्षणाच्या मुद्द्यांवरून बोलताना जोरदार टीका केली. सगळ्या पक्षांनी मराठा समाजाला पाठिंबा दिला असताना अजून त्याचा निर्णय का होत नाहीये? मोदी मागील दहा वर्षे बहुमताने सत्तेत होते, तर उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा उपस्थित का केला नाही?, असे सवाल राज ठाकरे (Raj Thackeray ) यांनी उपस्थित केले.

यावेळी त्यांनी महाराष्ट्राला आरक्षणाची गरजच नाही, असा पुनरुच्चार देखील केला. “सोलापूरच्या पत्रकार परिषदेत मी जे बोललो ते सर्वांनी पाहिलं ऐकलं आहे. पण त्यानंतर जाणीवपूर्वक बातम्या केल्या. त्या धक्कादायक होत्या. मात्र 2006 रोजी पक्षाची स्थापना झाली तेव्हापासून आमची एकच भूमिका राहिली आहे, ती म्हणजे आरक्षण द्यायचंच असेल तर आर्थिक निकषावर द्या”, असे वक्तव्य राज ठाकरे (Raj Thackeray )यांनी केले.

“शरद पवार-उद्धव ठाकरे यांना दंगली घडवायच्यात”

महाराष्ट्रात शिक्षणापासून, उद्योग आणि इतर गोष्टी उपलब्ध आहेत. आपल्या राज्यात नोकऱ्या आहेत. पण, बाहेरच्या राज्यातील लोक ते येऊन घेतात. त्याच गोष्टी आपल्या लोकांना दिल्या तर आरक्षणाची गरज उरणार नाही, असं मी म्हटलं होतं. असं पुढे राज ठाकरे म्हणाले.

यावेळी राज ठाकरे (Raj Thackeray ) यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप देखील केले.उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना पुढच्या तीन साडेतीन महिन्यात दंगली घडवायच्या आहेत. त्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत, असा आरोप राज ठाकरे यांनी केलाय.

News Title :  Raj Thackeray on Ajit Pawar

महत्त्वाच्या बातम्या-

“माझ्या नादी लागू नका, माझी पोरं काय करतील ते कळणारही..”; राज ठाकरेंचा इशारा

कमी बजेटमध्ये लाँच झाली ‘ही’ भन्नाट कार; जाणून घ्या किंमत

राज ठाकरेंचा शरद पवार-उद्धव ठाकरेंवर अत्यंत गंभीर आरोप; म्हणाले..

‘या’ अभिनेत्रीसोबत शुभमन गिल अडकणार लग्नबंधनात?

सोने-चांदीचा ग्राहकांना झटका; काय आहेत आजचे दर