मला सत्ता नको तर विरोधी पक्षात बसवा- राज ठाकरे

मुंबई | या देशाला सध्या सक्षम विरोधी पक्षाची गरज आहे. जे सत्तेतले आमदार करू शकत नाहीत. ते काम विरोधी पक्षातले आमदार करू शकतात. त्यामुळे मला विरोधी पक्षात बसवा, अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मतदारंकडे केली आहे.

मला वाटत नाही देशात कोणता पक्ष म्हणत असेल की मला विरोधी पक्षात बसवा. पण मी म्हणतो कारण सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारायला सक्षम माणसं हवीत. ती सध्या दिसत नाहीत, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

माझ्या तरूणांना रोजगार द्या असं सत्ताधारी पक्षातल्या आमदारांना म्हणता येत नाही मात्र सक्षम विरोधी पक्षातले आमदार असं म्हणू शकतात. त्यामुळे  महाराष्ट्रात जिथे-जिथे मनसेचे उमेदवार आहेत. त्यांना विजयी करा, असं आवाहनही राज यांनी यावेळी केलं.

याआधीच्या सभांमध्ये कायम माझ्या हातात सत्ता द्या. या महाराष्ट्राचा चेहरा मोहरा बदलून दाखवतो, असं राज ठाकरे म्हणताना दिसायचे. मात्र आज त्यांनी विरोधी पक्षाची ताकद काय असते हे सांगताना मला विरोधी बाकावर बसवा, अशी विनंती महाराष्ट्रातल्या मतदारांना केली आहे.

महत्वाच्या बातम्या-