बाबासाहेब पुरंदरेंना पोलीस संरक्षणात फिरावं लागतं हे दुर्देव!

मुंबई | ज्यांनी आपली पूर्ण हयात शिवव्याख्यानं देण्यात आणि शिवचरित्र लिहिण्यात घालवली. त्या बाबासाहेब पुरंदरेंना महाराष्ट्रात पोलीस संरक्षण घेऊन फिरावं लागतं हे दुर्देव आहे, अशी खंत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी व्यक्त केली. 

बाबासाहेब पुरंदरे यांच्या ९५ व्या वाढदिवसानिमित्त मुंबईत ‘शिवशाहीर सन्मान सोहळा’ पार पडला. या सोहळ्यात ते बोलत होते.

दरम्यान, मी वचन देतो यापुढे तुम्हाला पोलीस संरक्षणात फिरावं लागणार नाही, अवघा महाराष्ट्र बाबासाहेबांच्या सोबत आहे, असंही राज यावेळी म्हणाले.