बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

केतकी चितळेच्या पोस्टवर राज ठाकरे संतापले, म्हणाले…

मुंबई | अभिनेत्री केतकी चितळेने राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट केली आहे. केतकी चितळेच्या पोस्टनंतर विविध स्तरातून टीका करण्यात येत आहे. त्यातच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केतकी चितळेला खडेबोल सुनावले आहेत. महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये अशा लिखाणाला जागा नाही, असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे.

कोणीतरी केतकी चितळे नामक व्यक्तीने अतिशय खालच्या पातळीच्या आणि घाणेरड्या शब्दात श्लोकासारखे लिहून फेसबुक पोस्ट केलेली आहे. खाली काहीतरी भावे वगैरे, असं नाव टाकलेलं आहे. या लिखाणाचा आम्ही तीव्र निषेध करतो, असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये बरीच वर्षे कार्यरत असलेल्या शरद पवारांविरूद्ध तिने किंवा भावेन जे लिहिलं आहे ते साफ गैर आहे, असं राज ठाकरे म्हणाले आहेत.

ही महाराष्ट्राची संस्कृती नाही हे सांगणं गरजेचं आहे. असं लिहिणं ही प्रवृत्ती नाही तर एक मानसिक विकृती आहे, असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे. चांगल्याला चांगल आणि वाईटाला वाईट म्हणणं हेचं आजपर्यंत आपल्या महाराष्ट्रातल्या महापुरूषांनी, संतांनी तसेच असंख्य बुद्धीवंतांनी आपल्याला शिकवलं आहे, असं राज ठाकरे म्हणाले आहेत.

दरम्यान, कोणीही या राज्याची ही खालच्या पातळीवर नेऊ नये, अशी अपेक्षा राज ठाकरेंनी व्यक्त केली आहे. दोन चार विकृत टाळक्यांमुळे समाजामध्ये तेढ निर्माण होतो. द्वेषाची पातळी किती खालीपर्यंत आली आहे, हे राज्यकर्त्यांना समजलं असेल. त्यामुळेचं राज्य सरकारने याचा नीट छडा लावून या गोष्टीचा ताबडतोब बंदोबस्त करावा, अशी मागणी राज ठाकरेंनी केली आहे.

पाहा पोस्ट-

  

थोडक्यात बातम्या-

‘लाजा वाटल्या पाहिजेत’; केतकीच्या पोस्टवर छगन भुजबळ भडकले

“भगवे वस्त्र चढवून हातात हनुमानाची मुर्ती घेतली म्हणजे काही…”

‘विखारी आकसापोटी अशी गरळ ओकण्याआधी…’; अमोल कोल्हे संतापले

उद्धव ठाकरेंच्या सभेपूर्वी संजय राऊतांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

परिस्थिती जेवढी बिकट, मराठा तेवढाच तिखट; ‘सरसेनापती हंबीरराव’चा अंगावर काटा आणणारा ट्रेलर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More