मनमोहन सिंग, तुमची उणीव भासत आहे- राज ठाकरे

मनमोहन सिंग, तुमची उणीव भासत आहे- राज ठाकरे

मुंबई | देशाची अर्थव्यवस्था आर्थिक निरक्षरांनी गर्तेत ढकलली असताना माझ्या सकट तमाम भारतीयांना तुमच्या ज्ञानाची उणीव नक्कीच भासत आहे, असं मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. मनमोहन सिंग यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरे यांनी फेसबुकवर पोस्ट लिहिली आहे.

अर्थमंत्री असताना असेल किंवा पंतप्रधान असताना असेल तुम्ही देश ज्या पद्धतीने आर्थिक संकटातून बाहेर काढलात त्याचं महत्व आजच्या आर्थिक अराजकतेच्या काळात जाणवत आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. 

राजकारणात टीका होतच असते. ती कधी काळी आम्ही पण केली, पण चांगल्या गोष्टींचं कौतुक करण्याचं औदार्य आमच्याकडे नक्कीच आहे. डॉ.मनमोहन सिंग ह्यांच्या भाषणातलाच एक संदर्भ घेऊन म्हणेन ‘इतिहास तुमच्या कार्याचं आणि योगदानाचं नक्कीच योग्य मूल्यांकन करेल, अशा शब्दात त्यांनी मनमोहन सिंग यांना शुभेच्छा दिल्या आहेत. 

महत्त्वाच्या बातम्या-

-…तर मग राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री कसा होणार?; अजित पवारांचा कार्यकर्त्यांना सवाल

-पुत्रप्रेमापोटी बागवे खोटे आरोप करत आहेत, त्याला कसलाच आधार नाही- गोगावले

-आधार कार्ड मागण्याचा अधिकार खासगी कंपन्यांना नाही- सर्वोच्च न्यायालय

-… तर 5 लाख कार्यकर्ते शिवाजी पार्कवर बोलवा; शिवसेना नेत्यांचे कार्यकर्त्यांना आदेश

-मराठवाड्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा; धनजंय मुंडेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

Google+ Linkedin