‘पद्मावती’ सिनेमाचा वाद, राज ठाकरेंनी अखेर मौन सोडलं!

मुंबई | सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वी त्याला विरोद करणे चुकीचे आहे, असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलंय. इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. 

सिनेमा प्रदर्शित होऊ द्या, तो पाहू आणि त्यात काही आक्षेपार्ह असेल तर संजय लिला भन्साळी यांच्याशी चर्चा करुन त्या वादावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाईल, असं मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी म्हटलंय. 

दरम्यान, पद्मावतीला होणारा विरोध चांगलाच तीव्र झालाय. करणी सेनेनं तर संजय लिला भन्साळी आणि दीपिका पादुकोन यांना धमक्या दिल्यात.