Raj Thackeray | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. आज मनसेचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. यावेळी राज ठाकरे यांनी विविध विषयांवरून महाविकास आघाडीला टार्गेट केलं. राज्यात ठिकठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची मंदिरे बांधण्यापेक्षा विद्यामंदीर बांधा आणि गडकिल्ले सुधारा, अशा शब्दांत राज ठाकरेंनी (Raj Thackeray) उद्धव ठाकरेंना खडेबोल सुनावले.
काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी कोल्हापुरात एक घोषणा केली होती. महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर आम्ही प्रत्येक जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर बांधू, असं ते म्हणाले होते. छत्रपती शिवाजी महाराज आमचे दैवत आहे. जसं आम्ही जय श्रीराम म्हणतो. त्याच मोठ्या आवाजात आम्ही जय शिवराय म्हणणार, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्यांच्या याच विधानावरून राज ठाकरे यांनी टोलेबाजी केली आहे.
काय म्हणाले राज ठाकरे?
आज पत्रकार परिषदेत राज ठाकरे बोलत होते. “उद्धव ठाकरे जाहीरनाम्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभं करणार असं सांगत आहेत. पण, मला वाटतं त्यापेक्षा विद्या मंदिरं उभं करणं गरजेचं आहे. गडकिल्ल्यांचं संवर्धन केलं पाहिजे.”, असं राज ठाकरे म्हणाले.
पुढे त्यांनी निवडणुकीवरही भाष्य केलं. यावेळची निवडणूक तुम्ही सांगू शकत ना मी सांगू शकत. ना कोणी परमेश्वर सांगू शकत.मला वाटतं लोकांनी विसरू नये. तुम्ही उन्हातान्हात मतदान केलं. ते मत सध्या कुठे आहे, ते बघा. जो पक्ष तुम्हाला आवडत नाही त्यांना तुम्ही मतदान करत नाही. पण, तुमच्या मतावर निवडून आलेला दुसऱ्या पक्षात गेला तर तुमच्या मताची किंमत काय राहिली? त्यामुळे विचार करा, असं आवाहन देखील राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मतदारांना केलं आहे.
दरम्यान, आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा राज ठाकरेंनी जाहीरनामा प्रसिद्ध केला. “आम्ही हे करु” या नावाने हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. या जाहीरनाम्यात चार महत्त्वाच्या घटकांवर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. महिला, तरुण, आरोग्य आणि शिक्षण या क्षेत्रासाठी महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. (Raj Thackeray)
News Title – Raj Thackeray on uddhav thackeray
महत्त्वाच्या बातम्या-
‘मुख्यमंत्री होणं माझ्यासाठी..’; CM पदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा सर्वात मोठा खुलासा
राज्यात महाविकास आघाडीला बहुमत मिळणार?, आणखी एक सर्व्हे समोर
शाळकरी विद्यार्थ्यांना या महिन्यात सलग 4 दिवस सुट्ट्या मिळणार, कारण..
खरेदीची करा घाई! सोनं झालं स्वस्त, सराफा बाजारात काय आहेत सध्या किंमती?
दिशा सालियन प्रकरणी पुन्हा चौकशी लावणार, ‘या’ नेत्याचा आदित्य ठाकरेंना इशारा