“जनतेच्या मनात उद्धव ठाकरेंबद्दल राग, लोक आता मनसेची वाट बघतायेत”

Raj Thackeray | लोकसभेच्या निकालानंतर आता सगळे राजकीय पक्ष विधानसभेसाठी तयारीला लागले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला होता. आता विधानसभेतही मनसे बीजेपीला पाठिंबा देणार काय?, याबाबत सर्वांचं लक्ष लागून आहे.

दरम्यान, नुकत्याच एका सभेत राज ठाकरे यांनी महत्वाचं विधान केलं आहे. त्यांनी पदाधिकाऱ्यांसमोर केलेल्या भाषणामध्ये पुढील भूमिका सांगितली आहे. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर देखील जोरदार हल्ला केला.

” उद्धव ठाकरेंना मराठी माणसांचे मतदान झाले नाही”

मनसे मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी टीम तयार करणार आहे. या टीम राज्यभर मतदारसंघनिहाय आढावा घेणार आहेत.यासंदर्भात राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना काही सूचना देखील केल्या आहेत.

पदाधिकाऱ्यांसमोर केलेल्या भाषणामध्ये राज ठाकरे म्हणाले की, “त्यांना वाटत असेल की, आपल्याला मतदान झालंय. पण, वास्तव वेगळं आहे. उद्धव ठाकरेंना लोकसभा निवडणुकीमध्ये मराठी माणसांचे मतदान झाले नाही. त्यांच्याविरोधात जनतेच्या मनात राग आहे. त्यांना मोदींच्या विरोधातील मतदान झालं आहे.”, असं राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले आहेत.

विधानसभा मनसे स्वबळावर लढणार?

तसंच मराठी माणूस आपण रिंगणात कधी उतरतो आहे याची वाट बघत आहे, असंही यावेळी राज ठाकरे म्हणाले. त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांना सूचना केल्या.आपण 200 ते 225 जागांवर विधानसभा निवडणूक लढतो आहोत. विधानसभेच्या तयारीला लागा, असे आदेश राज ठाकरे यांनी दिले आहेत.

पुढे ते म्हणाले की, “मी कोणाच्याही पुढे जागावाटपाची चर्चा करायला जाणार नाही. कुठल्याच पक्षाचा जागांचा फॉर्म्युला ठरलेला नाही. त्यामुळे आपल्या पक्षाची भूमिका काय आहे हेच तुम्हाला सांगायचे आहे.”, राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या या विधानावरून सध्या तरी ते स्वबळावर विधानसभा लढणार असल्याचं म्हटलं जातंय.

News Title- Raj Thackeray on Uddhav Thackeray

महत्त्वाच्या बातम्या-

नवरा मैत्रिणीसोबत करत होता रोमान्स, तेवढ्यात बायकोने पाहिलं अन्…;संभाजीनगर हादरलं

गोळीबार प्रकरणात सलमान खानचा धक्कादायक जबाब; म्हणाला..

“जीव देऊन भागणार नाही बाळांनो, तुम्हाला माझी शपथ”; पंकजा मुंडेंची हात जोडून विनंती

भाजप अजित पवारांना वाऱ्यावर सोडणार?, विधानसभेआधी मोठा निर्णय घेणार

“मातोश्रीवर चाल करू पाहणारी स्वयंघोषित हिंदू शेरनी घायाळ झाली”