Raj Thackeray | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे हे सध्या विधानसभेच्या तयारीसाठी राज्याचा दौरा करत आहेत.आज (24 ऑगस्ट) ते विदर्भ दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी(Raj Thackeray) नागपूर येथे पत्रकार परिषद घेतली. त्यांनी वरळी मतदारसंघाबाबत मोठी घोषणा केली आहे. यामुळे ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांचं टेंशन वाढणार आहे.
“मी निवडणूक लढवणार आहे. वरळीत 37 ते 38 हजार आमचे मते आहेत. एकदा ही गोष्ट झाली. वारंवार कसे होईल, आम्ही सर्व मतदारसंघात उमेदवार देणार आहे. लोक माझ्या हाती सत्ता देतील.”, असं राज ठाकरे म्हणाले आहेत. वरळी हा आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ असून येथे आता मनसेने उमेदवार देणार असल्याची घोषणा केली आहे.
राज ठाकरे वरळीत उमेदवार देणार
यावेळी त्यांना माध्यम प्रतिनिधींनि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात उमेदवार देणार का?, असा प्रश्न केला. यावर देखील राज ठाकरे यांनी उत्तर दिलं. “महाराष्ट्रात आम्ही सर्व जागांवर उमेदवार उभे करणार आहोत. त्यामुळे शिंदे आणि फडणवीस यांच्याही विरोधात उमेदवार देऊ”, असं राज ठाकरे (Raj Thackeray)म्हणाले.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीबाबतही त्यांनी भाष्य केलं. “लोकसभेची वाफ आता निघून गेली आहे. लोकसभेला 400 पारच्या घोषणा आणि संविधान बदलण्याच्या घोषणेमुळे मुस्लीम आणि दलित समाजाने एकगठ्ठा मतदान केले. हे मतदान अँटी मोदी आणि अँटी शाह असे होते.त्यामुळे विधानसभेला गोष्ट वेगळी आहे.”, असं राज ठाकरे म्हणाले.
तसेच लाडकी बहीण योजनेबाबतही राज ठाकरे यांनी भाष्य केलं. लोक हुशार आहेत. पैसे मिळत असतील, तर ते नक्की घेणार. पण, यामुळे मतदान करतील, असं नाही. असं राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी म्हटलं.
News Title – Raj Thackeray on Worli Vidhansabha Election 2024
महत्त्वाच्या बातम्या-
पुणेकरांनो सावधान! तब्बल ‘इतके’ दिवस जिल्ह्याला पावसाचा अलर्ट
“आरोपीला फाशी होईपर्यंत..”; भर पावसात सुप्रिया सुळे महायुती सरकारवर कडाडल्या
सोनं, चांदी झाली स्वस्त! जाणून घ्या आजचे दर
सतर्क! पुढील काही तासांत धो-धो बरसणार, ‘या’ जिल्ह्यांना यलो आणि ऑरेंज अलर्ट
कोलकात्यात पुन्हा धक्कादायक घटना; प्रसिद्ध अभिनेत्रीच्या कारच्या काचा फोडल्या अन् ..