बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“महाराष्ट्रात योगी कुणीच नाही, आहेत ते फक्त सत्तेचे भोगी”

मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी राज्य सरकारला 3 मे पर्यंतचं अल्टिमेटम दिलं आहे. राज ठाकरेंनी भोंग्यांवरून आक्रमक भूमिका घेतल्यानंतर राज्यातील वातावरण तापलेलं पाहायला मिळत आहे.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी धार्मिक स्थळांवरील विशेषत: मशिदींवरील भोंगे उतवरण्याचा निर्णय घेतला. योगी सरकारच्या या निर्णयाचं राज ठाकरेंनी कौतुक करत त्यांचे आभार देखील मानले आहेत.

योगी आदित्यनाथ यांचं कौतुक करताना राज ठाकरेंनी महाविकास आघाडी सरकारवर (Mahavikas Aghadi) ताशेरे ओढले आहेत. आमच्याकडे महाराष्ट्रात योगी कुणीच नाही. आहेत ते फक्त सत्तेचे भोगी. महाराष्ट्र सरकारला सद्बुद्धी मिळो हीच आई जगदंबेचरणी प्रार्थना, असा घणाघात राज ठाकरेंनी केला आहे.

दरम्यान, राज ठाकरे 1 मे रोजी औरंगाबादमध्ये जाहीर सभा घेणार आहेत. त्यात राज ठाकरेंनी राज्य सरकारला भोंगे उतरवण्यासाठी 3 मे पर्यंतचं अल्टिमेटम दिल्याने राज ठाकरेंच्या या सभेकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

 

थोडक्यात बातम्या-

“बुळबुळीत टोमणे मारण्याचं पेटंट मुख्यमंत्र्यांकडेच, पंतप्रधानांनी तर नाव घेऊन कानाखाली जाळ काढला”

राज ठाकरेंपाठोपाठ देवेंद्र फडणवीसांचाही सरकारला डोस, भाजपची रविवारी बूस्टर डोस सभा

शरद पवारांचा ‘शकुनी काका’ असा उल्लेख करत पडळकरांचा हल्लाबोल, म्हणाले..

ट्विटरनंतर एलॉन मस्क खरेदी करणार ‘ही’ मोठी कंपनी, ट्विट करत म्हणाले…

खऱ्या आयुष्यातील जोडी मोठ्या पडद्यावरही एकत्र, ‘सरसेनापती हंबीरराव’ चित्रपटातील खास फोटो समोर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More