बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘…तोपर्यंत आमचं आंदोलन सुरूच राहणार’, राज ठाकरे स्पष्टच बोलले

मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी राज्य सरकारला 4 तारखेचं अल्टिमेटम दिलं होतं. त्यामुळे आज सकाळपासूनच मनसे आक्रमक झाली असताना राज ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.

मुंबईत 1140 मशिदी असून 135 मशिदींवर सकाळी पाच वाजण्याच्या आत अजान लावण्यात आली. आता पोलीस त्या 135 मशिदींवर कारवाई करणार की आमच्याच कार्यकर्त्यांना उचलणार?, असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला. तर महाराष्ट्रातील बहुतेक मशिदी अनधिकृत आहेत. त्यावरील भोंगेही अनधिकृत आहेत आणि सरकार त्यांना परवानगी देते अधिकृत, असं म्हणत राज ठाकरेंनी हल्लाबोल केला आहे.

अनधिकृत भोंगे खाली उतरवले गेले पाहिजेत तोपर्यंत आमचं आंदोलन सुरू राहणार. हा एक दिवसाचा विषय नाही कायमचा विषय आहे. त्यामुळे हे असंच सुरू राहणार. हा सामाजिक विषय, धार्मिक नाही. याला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केला तर आम्ही धार्मिक उत्तर देऊ, असा इशारा राज ठाकरेंनी दिला आहे.

दरम्यान, हा विषय सकाळच्या अजानपुरता नाही. ज्या वेळी बांग वाजेल त्या-त्या वेळी आमचे कार्यकर्ते हनुमान चालिसा वाजवणार. या महाराष्ट्रात शांतता नांदावी, भोंग्यांचे आवाज बंद व्हावेत. तसेच तुम्हाला जी प्रार्थना करायची आहे मशिदीत करा, हे आवाज बंद झाले पाहिजेत हीच अपेक्षा आहे, असं राज ठाकरे म्हणाले आहेत.

थोडक्यात बातम्या-

“जयंत पाटलांचं गणित बघून त्यांच्या गणिताच्या शिक्षकांना पश्चाताप होत असेल”

सर्वात मोठी बातमी! राणा दांपत्याला जामीन मंजूर

बाळासाहेबांचा ‘तो’ व्हिडीओ शेअर करत राज ठाकरेंचा शिवसेनेवर हल्लाबोल

मोठी बातमी! नवनीत राणांची प्रकृती खालावली, महत्त्वाची माहिती समोर

“स्वत:चा भाऊ मुख्यमंत्री झाला म्हणून एवढा द्वेष करणं दुर्दैवी”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More