Top News

राज ठाकरेंच्या सभेला आता कर्नाटकातून मागणी!

मुंबई |  महाराष्ट्रातील आक्रमक सभांनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या सभांना आता कर्नाटकातून मागणी आलेली आहे. कर्नाटकातील आमदार गणेश हुक्केरी यांनी पत्र लिहून राज यांच्या सभेचा आग्रह धरला आहे.

गणेश हुक्केरी यांचे वडील लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. कर्नाटकातल्या निपाणी येथे राज यांनी सभा घ्यावी, असं हुक्केरी यांनी पत्रात म्हटलंय.

विशेष म्हणजे गणेश हुक्केरी यांनी मराठीमधून राज ठाकरेंना पत्र लिहिलं आहे. माझ्या भाषणांच्या क्लिप्स फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात व्हायरल होत आहेत, असं पुण्याच्या सभेत राज ठाकरे यांनी सांगितलं होतं.

दरम्यान,  राज ठाकरे ज्या पद्धतीने भाजप आणि मोदींची पोलखोल करतायेत ती पद्धत देशात चांगलीच लोकप्रिय झालेली पाहायला मिळतीये.

महत्त्वाच्या बातम्या

-रावसाहेब दानवेंच्या प्रचाराला आले अमित शहा, मात्र हजारो खुर्च्या मोकळ्या!

-नथुराम गोडसे जिवंत असता तर त्यालाही भाजपने उमेदवारी दिली असती- काँग्रेस

-“माढ्यातील काही मुलं गद्दार निघाली, घरातल्या माणसाला सोडून दुसऱ्यांचा हात धरला”

-मोदी साहेब… महाराष्ट्र तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही- धनंजय मुंडे

-राहुल गांधी पंतप्रधान झाले तर…- आदित्य ठाकरे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या