सरकारला प्रश्न विचारण्याची मनसेच्या प्रत्येक उमेदवारामध्ये ताकद- राज ठाकरे

मुंबई | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे मुंबईतील सांताक्रुझमध्ये सभा घेत आहेत. यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. तसेच आज सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारण्याची गरज असून मनसेच्या प्रत्येक उमेदवारात ती ताकद आहे, असं राज ठाकरे यावेळी म्हणाले.

देशात एक क्रमांकाला असणारं राज्य आज अधोगतीला का जातय. तरुणांचे रोजगार का जात आहेत. प्रत्येक बाबतीत महाराष्ट्र मागे पडत आहे, असं का होतंय हे विचारण्याची आज गरज आहे. त्यामुळे मला विरोधीपक्षात बसवा, असं आवाहन राज ठाकरे यांनी केलं आहे.

आजपर्यंत कोणत्याही राजकीय पक्षाने केली नसेल अशी मागणी मी करत आहे. मला सत्ता नाही तर मला विरोधीपक्षात बसवा. कारण आज राज्याला एका प्रबळ  आणि कणखर विरोधी पक्षाची गरज आहे, असं राज ठाकरे म्हणाले आहेत.

दरम्यान, राज ठाकरे यांची मंगळवारी पुण्यात सभा होणार होती. मात्र, जोरदार पावसाच्या हजेरीने ठाकरे यांची सभा रद्द झाली होती.

महत्त्वाच्या बातम्या-