बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

उद्धव ठाकरेंच्या मदतीला राज ठाकरे धावले; पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केल्या ‘या’ मागण्या

मुंबई | कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारपासून राज्यात 15 दिवसांची सचारबंदी घोषित केली आहे. तर मुख्यमंत्र्यांनी फेसबुक लाईव्हमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे काही मागण्या केल्या आहेत. तर यासंबंधी मुख्यमंत्री पंतप्रधानांना पत्र देखील लिहिणार आहेत. त्यापूर्वीच राज्यात कोरोनाचा वाढता कहर पाहता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं आहे.

राज ठाकरेंनी मोदींना कोरोना रोखण्यासाठी काही उपाययोजना सुचवल्या आहेत. तर त्यात त्यांनी महाराष्ट्राला मदत करण्याचं आवाहन देखील केलं आहे. लाॅकडाऊन जाहीर करणं हे महाराष्ट्राला परवडणारं नाही. तो कायमचा उपायही नाही. पण जर महाराष्ट्राला पुरेशा लसी मिळतच नसतील तर पर्याय तरी काय उरतो? असा सवाल त्यांनी मोदींना विचारला आहे.

राज ठाकरे यांनी केंद्र सरकारकडे पुढील मागण्या केल्या आहेत-

1.महाराष्ट्र राज्याला स्वतंत्रपणे लस खरेदी करून द्याव्यात.

2.राज्यातील खाजगी संस्थांना देखील लस खरेदी करता याव्यात.

3.सिरमला महाराष्ट्रात मुक्तपणे, पण योग्य नियमन करून लस विक्रीची परवानगी द्यावी.

4.लसीचा पुरवठा योग्य वेळी व्हावा म्हणून इतर संस्थांना देखील लस उत्पादन करण्याची परवानगी द्यावी.

5.कोरोनाच्या उपचारासाठी लागणारी आवश्यक औषध उदा रेडमिसिविर, ऑक्सिजन याचा पुरेसा साठा राज्यात असावा, यासाठी राज्याने आवश्यक पाऊलं उचलण्याची राज्य सरकारला मोकळीक द्यावी.

आरोग्य हा विषय राज्याचा आहे, म्हणून केंद्राने राज्याला केवळ परवानगीच नाही तर स्थानिक स्थितीला अनुसरून उपाययोजना आखण्यासाठी प्रोत्साहन द्यावं, असं राज ठाकरेंनी पत्रात म्हटलं आहे. या सुचनांकडे सकारात्मक दृष्टिने पाहाल आणि प्रतिसाद द्याल, अशी अपेक्षा नव्हे खात्रीच आहे, असा विश्वास राज ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.

थोडक्यात बातम्या-

‘या’ लोकांना कोरोनामुळे मृत्यूचा जास्त धोका; समोर आलीय ही धक्कादायक माहिती

खुशखबर! यंदाच्या पावसाने बळीराजा सुखावणार, सरासरीच्या 103 टक्के पाऊस होणार!

मुंबई-पुण्याबाहेरही महाराष्ट्र आहे, तिकडेही लक्ष द्या- देवेंद्र फडणवीस

WHO प्रमुखांच्या ‘या’ वक्तव्यानं जगाचं टेन्शन वाढलं, म्हणतात…

माझी नाही तर कोणाचीच नाही म्हणत त्याने तरूणीसोबत केलं धक्कादायक कृत्य!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More