Raj Thackeray l विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुहागरमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा पार पडली. या सभेदरम्यान राज ठाकरेंनी कोकणातील उद्योगधंदे आणि येथील बेरोजगारीवरुन सरकारचे कान टोचत असतानाच एका तरुणाने बॅनरवर करुन त्यांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला आहे.
Raj Thackeray l राज ठाकरे काय म्हणाले?
राज ठाकरेंनी या बॅनरला देखील प्रतिसाद दिला आहे. तसेच ठाकरेंनी तो बॅनर देखील व्यासपीठावरुनच वाचून दाखवला आहे. “काय रे बाळा? राज काका आता एकदाचं काय ते होऊन जाऊ दे मुख्यमंत्री व्हा” या सभेमधील बॅनरची राज ठाकरे यांनी भाषण सुरु असतानाचं चांगलीच दखल घेतली आहे. त्यावेळी राज ठाकरेंनी “बरं” असा रिस्पॉन्स देत “एकदा हातात तर आमच्या द्या” असं सांगत “बाळा बस खाली” असं म्हणत त्याचं कौतुक देखील केलं आहे.
या सभेमधील या बॅनरची मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाषण सुरु असताना दखल घेतल्याने उपस्थितांनी शिट्ट्या आणि टाळ्या वाजवत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. यावेळी राज ठाकरे म्हणाले की, आता ही चिमुरडी येथे बॅनर घेऊन उभी आहे. मात्र पाच वर्षांनी ती केवढी असेल? तर वय कोणासाठी थांबत नाही. त्यामुळे अनेक बुजुर्ग मंडळी येथे असतील. तसेच किती वर्षे आपण त्याच त्याच विषयावर निवडणूक लढवणार? असा खडा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.
News Title : Raj Thackeray Ratnagiri Guhagar Speech For Vidhan Sabha
महत्वाच्या बातम्या –
एका झटक्यात झालेल्या कर्जमाफीचा मुद्दा पुन्हा चर्चेत; जाणून घ्या नेमका काय?
4 दिवसात सोयाबीनला हवा तसा भाव देणार, भाजपच्या ‘या’ नेत्याचं वक्तव्य
फॉर्म भरुनही पैसे आले नाही त्यांच्यासाठी मोठी अपडेट समोर!
नरेंद्र मोदी महायुतीचे सरकार येताच पहिले काम ‘हे’ करणार?
शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली मोठी घोषणा