राज ठाकरेंच्या महाराष्ट्र सैनिकांना थेट सूचना, म्हणाले… ‘आरोपीला…’

Badlapur Crime | बदलापुरात नामांकीत असलेल्या एका शाळेत साडेतीन वर्षांच्या दोन चिमुरडींवर अत्याचाराच्या घटना घडल्या. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात संताप व्यक्त केला जात आहे. याच घटनेप्रकरणी बदलापूरकरांनी (Badlapur Crime) आज बदलापूर बंदची हाक दिली आहे.

बदलापूरच्या नागरिकांनी रेल्वे स्थानकावर ठिय्या देत रेल्वे वाहतूक पूर्णपणे ठप्प केली आहे. गेल्या सात तासांपासून रेल्वे सेवा ठप्प आहे. या घटनेवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी ट्विट करत पोलिसांना सवाल केला आहे.

राज ठाकरेंच्या महाराष्ट्र सैनिकांना सूचना

बदलापूरच्या (Badlapur Crime) शाळेत लहान लहान मुलींच्या बाबतीत जो भयानक प्रकार घडला आहे तो धक्कादायक आणि संताप आणणारा आहे. मुळात या घटनेत गुन्हा दाखल करून घेण्यातच पोलिसांनी 12 तास का लावले?, असा सवाल राज ठाकरेंनी केलाय.

एका बाजूला कायद्याचं राज्य म्हणायचं, आणि दुसऱ्या बाजूला पोलिसांच्याकडून झालेला हा कुठला हलगर्जीपणा? माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी हा मुद्दा लावून धरला आहे, आणि माझं महाराष्ट्र सैनिकांना सांगणं आहे की या प्रकरणात आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा होईपर्यंत या विषयांत तुमचं लक्ष असू द्या, अशी सूचना राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिल्या आहेत.

Badlapur Crime | सरकारने घेतला मोठा निर्णय

बदलापूर (Badlapur) येथील दुर्दैवी घटनेची चौकशी करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस महानिरीक्षक दर्जाच्या वरिष्ठ IPS अधिकारी आरती सिंग यांच्या अध्यक्षतेखाली SIT गठित करण्याचे आदेश दिले आहेत.

पोलीस महानिरीक्षक दर्जाच्या वरिष्ठ आयपीएस अधिकारी आरती सिंग यांच्या अध्यक्षतेखाली ही एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. बदलापूरमधील चिमुकल्या मुलींवरील अत्याचाराच्या घटनेच्या तपासाला आता वेग आला आहे.

 

 महत्त्वाच्या बातम्या- 

केकेआरचा तुफानी फलंदाज आरसीबीमध्ये जाणार? काय आहे यामागचं कारण

वरुण ‘यू लव्ह आय’; पण मला मुली आवडत नाहीत?

बदलापूर अत्याचार प्रकरणी सरकारने घेतला सर्वात मोठा निर्णय!

पुढील काही तास धोक्याचे! ‘या’ जिल्ह्यांना IMD कडून यलो अलर्ट जारी

बदलापूर स्टेशनवर आंदोलक आक्रमक; पोलिसांवर दगडफेक