बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘…म्हणून अयोध्या दौरा स्थगित केला’; राज ठाकरेंनी सांगितलं कारण

पुणे | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पुण्यातील गणेश कला क्रिडा मंच येथे जाहीर सभा होत आहे. राज ठाकरे यांचा नियोजित अयोध्या दौरा रद्द झाल्यानंतर विरोधकांनी टिकेचे रान उठवलं होतं. त्यातच आता राज ठाकरे यांनी सभेत बोलताना विविध मुद्यांवर भाष्य केलं आहे.

तुमच्यावर केसेस नको म्हणून मी अयोध्या दौरा रद्द केला, मला माझी पोरं हाकनाक जाऊ द्यायची नव्हती, असं मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सांगितलं आहे.

बारा तेरा वर्षानंतर माफी मागण्याची आठवण झाली. हे सगळे आतून एक आहे. मशिदीवरील भोंगे, हनुमान चालीसा हे मुद्दे अनेकांना रूचले नाहीत. नवनीत राणा यांनी मातोश्रीवर हनुमान चालीसा म्हणायला गेले. मातोश्री काय मशिद आहे का?, असा सवालही राज ठाकरेंनी केला.

सगळे ढोंगी आहेत. यांचे हिंदुत्व फक्त बकबक आहे. त्यादिवशी मुख्यमंत्र्यांनी सभा झाली. तुम्ही काही वॉशिंग पावडर आहे का?, लोकांना रिझर्ट पाहिजे असतात. ते रिझर्ट आम्ही देतो, असं राज ठाकरे म्हणाले आहेत.

थोडक्यात बातम्या- 

‘मी काय कांड करणार?, मला कांड करायचा असता तर…’; सभेआधी वसंत मोरे संतापले

माझे जीवीची आवडी, पंढरपुरा नेईन गुढी; आषाढी वारीची जोरदार तयारी सुरू

‘माझ्यासोबत सेक्स केला तर…’; एलोन मस्कवर एअर होस्टेसने केला होता गंभीर ऑफर

तीन महिन्यापूर्वी सैन्यात भरती झालेल्या 22 वर्षीय प्रथमेश पवार यांना जम्मूत वीरमरण!

“हे सरकार बेईमान औलादीचं, यांना समुद्रात बुडवलं पाहिजे…”

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More