Top News औरंगाबाद महाराष्ट्र

राजमुद्रेवरुन सुरु झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंचं मोठं वक्तव्य

औरंगाबाद | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे हे मराठवाडा दौऱ्यावर आहेत, त्यावेळी पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. राज ठाकरे यांनी यावेळी विविध विषयांवर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. राजमुद्रेवरुन सुरु झालेल्या वादवरही त्यांनी भाष्य केलं आहे.

झेंड्यावरची राजमुद्रा ही प्रेरणा आहे आणि ती प्रेरणा म्हणूनच आम्ही बघतो. त्याचा वापर कधीही निवडणुकीच्या काळात करायचा नाही हे मी स्पष्ट केलं आहे. निवडणुकीच्या वेळेस पक्षाचं चिन्ह असलेला झेंडाच वापरला जाईल, असं राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे.

आताचा झेंडा पक्षाचा अधिकृत झेंडा करायचा ह्यावर आमची चर्चा गेले 1 वर्ष सुरु होती. आयोगाला आम्ही 3 वर्षांपूर्वी अधिकृतपणे कळवलं होतं. फक्त त्याचं अनावरण 23 जानेवारीला केलं इतकंच, असंही ते म्हणाले आहेत.

बदलेल्या भूमिकेच्या चर्चांवरही राज यांनी भाष्य केलं. ज्यांनी भूमिका बदलली आणि सत्तेत जाऊन बसलेत त्यांना कोणी प्रश्न विचारत नाहीये. मी पक्षाचा झेंडा बदललाय, भूमिका नाही, असं ते म्हणाले आहेत.

ट्रेंडिंग बातम्या-

विद्यार्थिनींनी घेतली प्रेम आणि प्रेम विवाह न करण्याची शपथ; पंकजा मुंडे संतापल्या

भारत भेटीला येणाऱ्या ट्रम्पंना झोपडपट्टी दिसू नये म्हणून उभी राहतीये भिंत

महत्वाच्या बातम्या-

मी पक्षाचा झेंडा बदललाय, भूमिका नाही; राज ठाकरेंनी केलं स्पष्ट

माझा ‘हिंदुहृदयसम्राट’ किंवा ‘हिंदुजननायक’ असा उल्लेख करु नका- राज ठाकरे

क्रिकेट हा खेळ ‘जेंटलमेन्स गेम’ राहीला नाही- कपील देव

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या