Top News औरंगाबाद महाराष्ट्र

मनसेचे काही कार्यकर्ते गद्दार आहेत- राज ठाकरे

Loading...

औरंगाबाद | पक्षातील काही कार्यकर्ते गद्दार आहेत. ते अत्यंत खोट्या आणि चुकीच्या बातम्या माध्यमांना देत आहेत. अशा कार्यकर्त्यांची नावे माझ्याकडे आली आहेत. अशी लोकं मला पक्षात नकोत. येत्या दोन-तीन दिवसात यांचं काय करायचं याबाबत निर्णय घेईन, असं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे म्हणाले आहेत.

राज ठाकरे मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना त्यांनी कानउघाडणी केली आहे. गद्दारांना माझ्या पक्षात स्थान नाही, दोन दिवसात गद्दारांना पक्षातून हाकलून देईन, असा इशारा त्यांनी दिला आहे.

Loading...

पक्षाशी गद्दारी करणाऱ्यांना पक्षात कोणतंही स्थान नाही. काही जण मुद्दामहून पक्षाची बदनामी करत आहेत. त्यांची गंभीर दखल घेतली जाणार असल्याचं राज ठाकरे म्हणाले आहेत.

दरम्यान, काही दिवसांपासून राज ठाकरे यांना हिंदूह्रद्यसम्राट आणि हिंदूजननायक असं काही कार्यकर्त्यांकडून संबोधलं जात आहे. यावर माझा असा उल्लेख करु नका, असं राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं होतं.

Loading...

ट्रेंडिंग बातम्या-

राज्यसभेसाठी उदयनराजे भोसले यांच्या नावावर शिक्कामोर्तब!

“सत्तेसाठी भुकेल्या शरद पवारांनी उसनं अवसान आणू नये”

महत्वाच्या बातम्या-

Loading...

जगात पहिला क्रमांक माझा, त्यानंतर मोदींचा; डोनाल्ड ट्रम्प यांचं ट्वीट

इंदुरीकरांची बदनामी करणं पडलं महागात; गुन्हा दाखल!

शेतकऱ्यांनो काळजी करू नका, आता सरकार तुमचं आहे- मुख्यमंत्री

Loading...
Loading...

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या