Top News विधानसभा निवडणूक 2019

मला माझा आवाका माहितेय, मी उगीच उंटाचा मुका घ्यायला जाणार नाही- राज ठाकरे

मुंबई | आजची राजकीय स्थिती पाहता,  मला माझा आताचा आवाका माहितेय, उगीच उंटाचा मुका घ्यायला जाणार नाही. सत्ता नको, विरोधी पक्षाची संधी द्या, असं आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं आहे. ते मुंबईतील खार येथील सभेत बोलत होते.

सध्याची परिस्थिती गंभीर आहे. विरोधीपक्षातील नेते भाजपमध्ये प्रवेश करत आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारणारा कोणी राहिलेला नाही. सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारणाऱ्या कणखर आणि प्रबळ विरोधी पक्षाची आज राज्याला गरज आहे. त्यामुळे मनसेला संधी द्या, असं राज ठाकरे म्हणाले आहेत.

महाराष्ट्र एक आघाडीचे राज्य होेते. मात्र सत्ताधाऱ्यांच्या कर्माने ते अधोगतीला जात आहे. लोकांना रोजगार मिळत नाहीय आणि ज्यांच्याकडे रोजगार आहेत ते गमावत आहेत. महाराष्ट्राच्या या अधोगतीबाबत सरकारला जाब विचारण्याची गरज आहे, असं ठाकरे  म्हणाले आहेत.

दरम्यान, राज ठाकरे यांनी मुंबईमधून आपल्या प्रचाराचा शुभारंभ केला. त्यांची मंगळवारी पुण्यात सभा होणार होती. मात्र, जोरदार पावसाच्या हजेरीने ती रद्द झाली होती.

महत्त्वाच्या बातम्या-

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या