बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मास्क घालणार नाही म्हणणाऱ्या राज ठाकरेंनी पुण्यात मास्क लावलाच!

पुणे | राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने निर्बंध लादले होते. त्यासोबत विनामास्क फिरण्यास बंदी घातली होती. मात्र याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे अपवाद ठरले होते. राज ठाकरे यांनी जाहीरपणे सांगितं होतं की मास्क लावणार नाही. मात्र पुण्यात त्यांनी मास्क लावलेलं दिसलं.

राज ठाकरे यांनी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षबांधणीसाठी आतापासून तयारी करत असल्याचं दिसत आहे. राज ठाकरे तीन दिवसीय पुणे दौऱ्यावर आहेत. पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर त्यांनी महाराष्ट्र्र भूषण बाबासाहेब पुरंदरे यांची भेट घेतली.

बाबासाहेब पुरंदरे यांची भेट घेताना राज ठाकरे यांनी मास्क घातला होता. राज यांच्यासोबत मनसेचे पदाधिकारी आणि इतर कार्यकर्ते होते. त्यामुळे कोरोनाची परिस्थितीत पाहता खबरदारी म्हणून सर्वांनी मास्क लावूनच बाबासाहेबांच्या घरात प्रवेश केला.

दरम्यान, मनसेने प्रभाग अध्यक्ष ही नेमणूक रद्द करून शाखा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांची नेमणूक केली जाणार आहे. जो शाखा अध्यक्ष चांगल काम करेल त्याच्या घरी आपण जेवण करण्यास जाणार असल्याचं राज ठाकरे यांनी पुण्यातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीवेळी मार्गदर्शन करताना म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

लाईव्ह मॅचदरम्यान या व्यक्तीने महिलेसोबत केलं वाईट कृत्य; व्हिडीओ व्हायरल

5 वी आणि 8वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेची तारीख जाहीर; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती

दिलासादायक! मुंबई कोरोनामुक्तीच्या वाटेवर; आजची रुग्णसंख्या आली 400च्या खाली

चीनने तयार केली जगातील सुपरफास्ट ट्रेन; प्रतितासाचा वेग पाहून तुम्हीही व्हाल थक्क!

दिलासादायक! महाराष्ट्रात नव्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत लक्षणीय घट, पाहा आकडेवारी

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More