महाराष्ट्र मुंबई विधानसभा निवडणूक 2019

रस्त्यावर सभा घ्यायला परवानगी द्या; राज ठाकरेंची निवडणूक आयोगाकडे मागणी

मुंबई | विधानसभा निवडणुकीच्या प्रचारसभा रस्त्यावर घेण्याची परवानगी राज ठाकरेंनी निवडणूक आयोगाकडे मागितली आहे. पाऊस लांबल्याने मैदानांमध्ये सभा घेण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे रस्त्यांवर सभा घेण्यास परवानगी द्या, अशी मागणी करणारं पत्र मनसेनं निवडणूक आयोगाच्या आयुक्तांना लिहीलं आहे.

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी मुंबई, ठाणे, पुणे, नाशिकमधील मैदानं आरक्षित करण्यात आली आहेत. मात्र पावसांमुळे मैदानामध्ये पाणी साचत असल्यानं सर्वच राजकीय पक्षांच्या सभा रद्द कराव्या लागत आहेत.

पावसामुळे मैदानात चिखल होतो आणि पाऊस थांबला तरी चिखलामुळे सभा घेणं शक्य होत नाही, असं मनसेनं निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रामध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, राज ठाकरेंची काल पुण्यात पहिली प्रचार सभा पार पडणार होती. मात्र पावसामुळे ही सभा रद्द करावी लागली. सर्व परिस्थिती लक्षात घेऊन  प्रचार सभांसाठी आम्हाला रस्ते उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी मनसेकडून करण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या- 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या