मुंबई | बेस्टच्या वीज दरवाढीच्या प्रस्तावावर मनसेने आक्षेप घेतला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाला पत्र लिहिलं आहे. यामध्ये विद्युत विभागाचा नफा परिवहन विभागाकडे वळता करू नये, अशी मागणी राज ठाकरे यांनी केली आहे.
परिवहन विभागाबाबत महाविकास आघाडी सरकार उदासीन आहे, अशी टीका राज ठाकरेंनी पत्राद्वारे केली आहे. तसेच बेस्ट परिवहनाचा तोटा महापालिकेने भरावा, वीज विभागाचा नफा परिवहनाला देऊ नये, असे आदेश देण्याची मागणी राज ठाकरेंनी पत्रातून केली आहे.
परिवहन विभागाला कोणत्याही प्रकारे कर सवलत, अनुदान किंवा टोलमाफी न देण्याची भूमिका आहे. तसेच मुंबई महापालिकेने अर्थसंकल्पात बेस्टचा परिवहन विभाग विलीन करण्याचे आश्वासन न पाळल्याने विभागाचा तोटा वाढत चालला आहे, असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे.
दरम्यान, मुंबईकरांवर वीज दरवाढीचा बोजा पडणार नाही. यासाठी विद्युत नियामक आयोगाने ठेवलेल्या सुनावणीवेळी विस्तृत बाजू मांडण्यासाठी योग्य कागदपत्रांसह पक्षाचे शिष्टमंडळ उपस्थित राहील, असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे.
ट्रेंडिंग बातम्या-
जामियामध्ये गोळीबार करणाऱ्या तरुणाचा हिंदू महासभेकडून होणार सत्कार!
तुम्ही अॅक्सिडंटल मुख्यमंत्री आहात का? संजय राऊतांच्या प्रश्नावर उद्धव ठाकरे म्हणतात…
महत्वाच्या बातम्या-
प्रशांत गडाखांचा ‘रंग बरसे’ गाण्यावर भन्नाट डान्स; पाहा व्हिडीओ-
मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यासाठी आपण लढा देणार- संभाजी राजे
अरे काय पाहिजे सांगा, मी द्यायलाच बसलोय- अजित पवार
Comments are closed.