राज ठाकरेंनी शाहरूख-दीपिकाला संदेश पाठवत केलं पठाणचं कौतुक
मुंबई | बाॅलिवूड(Bollywood) अभिनेता शाहरूख खान(Shah Rukh Khan) आणि अभिनेत्री दीपिका पादुकोनचा(Deepika Padukone) ‘पठाण’ (Pathaan) हा चित्रपट चांगलाच सुपरहिट ठरला आहे. या चित्रपटानं कमाईच्या बाबतीत अनेक चित्रपटांचे रेकाॅर्ड तोडले आहेत.
पठाणचे यश पाहता आता काहीजण पठाणचे कौतुक करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही(Narendra Modi) संसदेत बोलताना पठाणचे कौतुक केले. आता मोदींपाठोपाठ मनसे प्रमुख राज ठाकरेंनीही(Raj Thackeray) पठाणचं कौतुक केल्याची माहिती समोर आली आहे.
राज ठाकरेंनी पठाणला मिळालेल्या यशाबद्दल शाहरूख खान आणि दीपिकाला शुभेच्छा संदेश पाठवला आहे. तसेच ठाकरेंनी शाहरूखला पुष्पगुच्छही पाठवला आहे.
यापूर्वी मनसेकडून पठाण चित्रपटाला विरोध करण्यात आला होता. परंतु राज ठाकरेंनी अचानकच या चित्रपटाचे कौतुक केल्यानं सोशल मीडियावर विविध चर्चा रंगल्या आहेत.
दरम्यान, पठाण चित्रपटातील ‘बेशरम’ हे गाण रिलीज झाल्यापासून हा वाद सुरू झाला होता आणि आता चित्रपटाला मिळालेल्या अफाट यशानंतरही हा वाद सुरूच आहे, असं चित्र दिसत आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
Comments are closed.