‘हे एका पंतप्रधानाला शोभत नाही’; राज ठाकरेंनी मोदींना सुनावलं

पुणे | पुण्यात (Pune) सुरू झालेल्या 18 व्या जागतिक मराठी साहित्य संमेलनात काल राज ठाकरे (Raj Thackeray) यांची एक मुलाखत झाली. या मुलाखतीत बोलताना राज ठाकरे यांनी विविध प्रश्नांवर उत्तरे दिली आहेत.

मुलाखतकाराने राज ठाकरे (Raj Thackeray) यांना देशात संघराज्याची चौकट मोडून एकाच राज्याला सातत्याने प्राधान्य दिलं जात आहे, असं वाटत नाही का? असा प्रश्न विचारला. यावर राज ठाकरेंनी उत्तर दिलंय. यावेळी बोलताना राज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.

ज्यावेळी मी हे बोललो होतो त्यावेळी सगळ्यांचा शहामृग झाला होता. सर्वांनी माना खाली घातल्या होत्या. आणि माझं आजही तेच म्हणणं आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाकडे लक्ष दिले पाहिजे, असं राज ठाकरे म्हणालेत.

एखाद्या भूमिकेला विरोध करणं राजकारणात गैर नसतं, असंही राज ठाकरे यावेळी म्हणालेत. जर एखाद्याने चांगलं काम केलं तर त्याचं अभिनंदन इतका मोठेपणा आणि मोकळेपणा तुमच्या असला पाहिजे, असं राज ठाकरे म्हणाले.

ज्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान झाले त्यावेळी मी सर्वात प्रथम बिहार, उत्तर प्रदेश आणि झारखंड यांचा विकास झाला पाहिजे असं म्हणालो होतो. अशी माझी भूमिका होती. त्यानंतर 2019 मध्ये लावरे तो व्हिडिओ मधून राज ठाकरेंनी आपली भूमिका मांडली होती.

महत्त्वाच्या बातम्या-