“पुणे बरबाद व्हायला..”; राज ठाकरेंचा राज्य सरकारवर संताप

Raj Thackeray | महाराष्ट्राचे सांस्कृतिक शहर म्हणून ओळखले जाणारे पुणे शहर मुसळधार पावसामुळे चर्चेत आले. मुसळधार पावसामुळे येथे पुरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. पुण्यात गेल्या 32 वर्षांमध्ये पहिल्यांदाच इतका पाऊस झाला असल्याचं हवामान तज्ज्ञांनी म्हटलं. पुण्यातील अनेक घरे पाण्याखाली गेली. जनजीवन विस्कळीत झाले. (Raj Thackeray)

खडकवासला धरणातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सोडण्यात आल्याने पुण्यात पुर आला. यानंतर नागरिकांकडून प्रचंड संताप व्यक्त करण्यात आला. पहिल्यांदाच पुण्यातील परिस्थिती हाताळण्यासाठी आर्मीला उतरावे लागले. या सर्व पार्श्वभूमीवर आता मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“..याला सरकार चालवणे म्हणतात का?”

राज ठाकरे (Raj Thackeray) आज (29 जुलै) पुणे दौऱ्यावर आहेत.पुण्यात झालेल्या मुसळधार पावसानंतर आलेल्या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी राज ठाकरेंनी पुणे दौरा केला. यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत संताप व्यक्त केला. त्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली.

महाराष्ट्राचा कोणी विचार करणार आहे की नाही?, असा संतप्त सवाल राज ठाकरे यांनी केला. “पावसात पुण्यामध्ये अनेक गाड्या वाहून गेल्या. यावर विमा देणारे सांगतात की नैसर्गिक आपत्ती असेल तर आम्ही काही विमा देऊ शकत नाही. मात्र, कोणतीही पूर्वसूचना न देता जर पाणी सोडलं असेल आणि यामुळे जर नुकसान झालं असेल तर मग राज्य सरकारने यात लक्ष द्यायला हवे. गेल्या अनेक वर्षांपासून सांगतोय की, मुंबई बरबाद व्हायला वेळ लागला. पुणे बरबाद व्हायला वेळ लागणार नाही. आजचे चित्र हे त्याचेच आहे.”, असं राज ठाकरे म्हणाले आहेत.

“महाराष्ट्राचा कोणी विचार करणार आहे की नाही?”

यावेळी त्यांनी मनपा प्रशासनावर देखील निशाणा साधला. “सरकार प्रत्येक वेळी डेव्हलपमेंट प्लॅन आणते. पण, टाऊन प्लॅनिंग नावाची काहीही गोष्ट नसते. किती गाड्या येतात, किती विद्यार्थी येतात, लोक राहणार कसे याचं काहीही प्लॅनिंग नसतं. टाऊन प्लॅनिंगमध्ये शाळा, कॉलेज, रुग्णालय अशा सर्व गोष्टी असतात. पण, आपल्याकडे दिसली जमीन की विक असा सर्व प्रकार सध्या सुरु आहे. राज्य सरकारमधील काही लोक आणि बिल्डर हे सर्व मिळून या गोष्टी सुरु आहेत. त्यामुळे ही शहर अशीच नष्ट होत जाणार.”, असा संताप राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी व्यक्त केला.

बाहेरुन येणाऱ्यांना तुम्ही फुकट घरं देत आहात आणि इथे राहणारे लोक भिका मागत आहेत. याला सरकार चालवणं म्हणतात का? राज्य म्हणून कोणाचं लक्ष आहे की नाही?, महाराष्ट्राचा कोणी विचार करणार आहे की नाही?, असे संतप्त सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केले आहेत.

News Title –  Raj Thackeray slam state govt on Pune Flood

महत्त्वाच्या बातम्या-

“त्याने पँटची चैन उघडली अन् माझा हात…”, प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव

“लाडकी बहीण योजनेसाठी पैसे नसतील तर राज्यपालांचा बंगला विका”

“शरद पवार दंगली घडवण्याचं काम करत आहेत”; ‘या’ नेत्याचा थेट आरोप

“देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या राजकारणातले खलनायक”; संजय राऊतांची टीका

पुण्यातील धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचं थैमान; खडकवासलातून विसर्ग वाढवला