बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शिवसेना फोडल्याचं श्रेय फडणवीसांनी घेऊ नये, ते उद्धव ठाकरेंनाच – राज ठाकरे

मुंबई | सुरुवातीच्या काळात भाजप (BJP) आणि त्यांचे नेते आणि प्रवक्ते हे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडाला शिवसेनेचा अंतर्गत मामला आहे,असे म्हणत होते. पण नंतर शिंदे गटाने भाजपसोबत सरकार स्थापन केले, तेव्हा सर्वांना कळून चुकले की, शिवसेनेच्या बंडामागे भाजपचा वरदहस्त आहे. स्वत: एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या सरकारच्या पहिल्या आणि विशेष अधिवेशनातील दिर्घवेळ चाललेल्या भाषणात हा गौप्यस्फोट केला होता.

आता यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मार्मिक वक्तव्य केले आहे. माझ्याकडे फडणवीस आले तेव्हा मी त्यांना सांगितले, की उगीच आजच्या परिस्थितीचे फुकटचे श्रेय घेऊ नका. जी गोष्ट आज घडली आहे, ती ना तुम्ही घडवली, ना अमित शहांनी घडवली ना भाजपने घडविली, ना अन्य कोणी माणसांनी घडवली. ती फक्त उद्धव ठाकरेंनी घडवली. याचे श्रेय फक्त उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) द्यावे लागेल, असा मिश्कील टोला राज ठाकरेंनी शिवसेना आणि उद्धव ठाकरेंना लगावला.

बाळासाहेब ठाकरे हयात असते तर आजची परिस्थिती ओढवली नसती. शिवसेना एखादी संस्था किंवा पक्ष नसून एका विचाराने बांधली गेलेली माणसे आहेत. बाळासाहेबांच्या विचारांवर ती माणसे चालत होती. बाळासाहेब हयात होते, ते विचार होते, ते गेले आणि विचारसुद्धा गेले, असे म्हणत त्यांनी शिवसेनेवर आणि त्यांच्या दुर्दशेवर भाष्य केले.

संजय राऊत (Sanjay Raut) यांची रोखठोक आणि शिवराळ भाषेतील बोलणी यामुळे देखील सुद्धा लोकांना कंटाळा येऊन ते दुरावले. मी शिवसेना सोडली तेव्हाची देखील हीच कारणे होती. शिवसेना सोडून गेलेल्यांची कारणे सुद्धा तीच राहिली आहेत. राज ठाकरे यांनी एका वृत्त वाहिनीला मुलाखत दिली त्यात ते बोलत होते.

थोडक्यात बातम्या – 

“दोन मंत्र्यांचं सरकार कोसळणार आणि अजित पवार मुख्यमंत्री होणार”

“संजय राऊत बेरोजगार आणि उद्धव ठाकरे घरीच बसून असतात”

शिंदे गट मनसेत विलीन होणार?, राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं

पाचव्या मजल्यावरून चिमुकली थेट खाली, देवासारखा आला तरूण; चित्तथरारक घटना कॅमेऱ्यात कैद

‘संजय राऊतांनी हलकटासारखं सांगितलं इथून जा, तेव्हाच ठरवलं…’, गुलाबराव पाटलांचं मोठं वक्तव्य

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More