राज ठाकरे सासरेबुवा होणार, आज मुलाचा साखरपुडा!

मुंबई | राज ठाकरे यांचे चिरंजिव अमित ठाकरे यांचा आज साखरपुडा होणार आहे. मिताली बोरुडे असं अमित यांच्या होणाऱ्या पत्नीचं नाव आहे. 

अमित आणि मिताली यांची जुनी ओळख असल्याचं कळतंय. या ओळखीचं प्रेमात रुपांतर झालं आणि आता दोघे विवाहबंधनात अडकणार आहे. मिताली फॅशन डिझायनर असल्याचं कळतंय़.

दरम्यान, आज राज ठाकरेंच्या लग्नाचा वाढदिवस आहे. हाच मुहूर्त साधत ठाकरे कुटुंबियांच्या कृष्णकुंज निवासस्थानी हा साखरपुडा समारंभ पार पडणार आहे. 

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या