राज ठाकरे यांच्या ठाण्यातील भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

-ही कुठल्या इतर पक्षाची नाही, मनसेची सभा आहे, जागा जास्त लागते हे पोलिसांना समजायला हवं

-भाषण असल्यावर वीज बंद करावी लागते, केबल बंद करावे लागतात ही तुमची ताकद आहे

-हार्दिक पटेलच्या क्लिप समोर आणल्या, त्याचं आयुष्य आहे, त्याला जगू द्या

-मनसेने 2014 ला विधानसभा निवडणुकीत ब्ल्यू प्रिंट आणली होती, भाजपवाले गुजरातमध्ये 2017 ला ब्ल्यू फिल्मच्या सीडी काढून निवडणुका लढवत आहेत

-जामिनासाठी एक कोटींचा बॉण्ड कसा मागता?

-कायदा मोडतात त्यांच्याविरोधात मनसेने आतापर्यंद आंदोलनं केली, आमच्याविरोधातच कायदा मोडला म्हणून केसेस का?

-सरकारला नाही जमलं ते मनसैनिकाने करुन दाखवलं

-सगळे पक्ष अनधिकृत फेरीवाल्यांच्या बाजूने, पण रेल्वेने प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांबद्दल यांना काहीही वाटत नाही

-सगळे पक्ष अनधिकृत फेरीवाल्यांच्या बाजूने, पण रेल्वेने प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांबद्दल यांना काहीही वाटत नाही

-फेरीवाल्यांकडून जो हफ्ता मिळतो त्यामुळे सर्वांना त्यांचा कळवळा

-मनसेची सगळी आंदोलनं कायदा मोडणाऱ्यांविरोधात, कायदा मोडण्यासाठी नाही

-मनसेच्या आंदोलनानंतर 64 अनधिकृत टोल नाके बंद झाले, भाजपने विरोधात असताना टोलमुक्त महाराष्ट्रची घोषणा केली होती

-मनसेच्या आंदोलनामुळेच टोल बंद झाले, मात्र आम्हाला मांडवली केली म्हणून प्रश्न विचारतात

-दुकानांच्या पाट्या मराठी करण्यासाठी पुन्हा आंदोलन सुरु करावं लागणार, काही जण अजूनही सुधरलेले नाहीत

-नीट परीक्षेचा विषय मोदींच्या कानावर घातला म्हणून तो प्रश्न सुटला

-भाजपवाल्यांनो नीट समजून घ्या, जेव्हा सत्ता बदलेल तेव्हा दरोड्याच्या केस तुमच्यावरही पडतील

-ग्रामीण भागावर खर्च करायला पैसे नाही, सगळा पैसा शहरात जातोय, जिथे परप्रांतीय येत आहेत

– फेरीवाल्यांबाबत हायकोर्टाने जो निर्णय दिलाय, त्याला सरकार सुप्रीम कोर्टात जाऊन स्टे लावण्याच्या तयारीत आहे

-आमच्यावरची कलमं कमी करा यासाठी पोलिसांच्या बाजूने उभा राहत नाही, पोलीस स्वाभिमानाने जगला पाहिजे यासाठी आंदोलनं असतात

-भाजपला काय करायचं हेच समजत नाही, ‘घर का ना घाट का’ अशी अवस्था

-मोदींना गुजरातच्या माणसाविषयी प्रेम असेल, तर राज ठाकरेला महाराष्ट्राच्या माणसाविषयी नसेल का?

-बुलेट ट्रेन ही फक्त गुजरातसाठी आहे, एक लाख कोटींचं कर्ज देशातल्या प्रत्येक नागरिकाने फक्त गुजरातच्या माणसासाठी फेडायचंय

-महाराष्ट्र आपापसातच भांडतोय, त्यात बाहेरच्यांचं फावतंय

-महाराष्ट्रातला मुसलमान जिथे राहतो, तिथे दंगली होत नाहीत, बाहेरचे जिथे येतात तिथेच दंगली होतात

-महाराष्ट्रातले तरुण बेरोजगार, पण बाहेरचे येऊन डोळ्यासमोर रोजगार घेऊन जात आहेत

-आपलं राज्य वाचवायचं असेल तर सर्व राजकीय नेत्यांनी एकत्र या

-प्रत्येक राज्याला आपल्या राजभाषेबद्दल आपुलकी आणि जिव्हाळा, आम्हीच काय घोडं मारलंय?

-प्रत्येक राज्याला आपल्या राजभाषेबद्दल आपुलकी आणि जिव्हाळा, आम्हीच काय घोडं मारलंय?

-समृद्धी महामार्ग बांधून वेगळं राज्य स्थापन करायच्या विचारात असाल, तर मार्ग मध्येच तोडला जाईल