बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महापालिका निवडणुकांसाठी मनसेच्या मोर्चेबांधणीला सुरुवात; राज ठाकरे दोन दिवस पुण्यात मुक्कामी

पुणे | पुणे महापालिका निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही जोमाने कामाला लागली आहे. पुणे महापालिका निवडणुकीसाठी खुद्द पक्षाध्यक्ष राज ठाकरे मैदानात उतरले असून आजपासून दोन दिवस ते पुण्यात मुक्कामाला असणार आहेत.

आज आणि उद्या ते मुक्कामी आहेत. मनसेच्या शहर कार्यालयाचे उद्घाटन राज ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. त्याचसोबत मनसेच्या काही प्रमुख नेत्यांसोबत राज ठाकरे बैठक घेणार आहेत.

पुढील आठवड्यात ते तीन दिवसीय नाशिक दौऱ्यावर जाणार आहेत. 16 ते 18 जुलै या कालावधीत ते नाशिक येथे असतील. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांचे हे दौरे महत्त्वाचे असल्याचं सांगितलं जात आहे. राज ठाकरे यांच्या या दौऱ्यांमुळे मनसैनिक नव्या उत्साहाने कामाला लागण्याची शक्यता आहे.

आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून खांदेपालट करण्यात आला आहे. यामध्ये मनसेचे डॅशिंग आणि आक्रमक नेते वसंत मोरे यांच्याकडे शहराध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. तर विद्यमान शहर अध्यक्ष अजय शिंदे यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

थोडक्यात बातम्या- 

विधानसभा अध्यक्षपदाबाबत शरद पवारांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

कडक लॉकडाऊन करा किंवा निर्बंध पूर्णतः काढा- राजेश टोपे

आईच्या डोळ्यातल्या पाण्यानं चोरालाही फुटला पाझर, चोरलेलं बाळ परत आणून दिलं

‘लंडनमध्ये मी स्वातंत्र्याचा अनुभव घेते आहे’; सोनम कपूर सोशल मीडियावर झाली ट्रोल

तोकडे कपडे घातल्याने फिटनेस माॅडेलला विमानातून खाली उतरवलं!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More