महाराष्ट्र मुंबई

नरेंद्र मोदी-ममता बॅनर्जी वादात राज ठाकरेंचा मोठा निर्णय

मुंबई | पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जीं या धरणे आंदोलनाला बसल्या आहेत. या धरणे आंदोलनाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी आपला पाठींबा दर्शवला आहे. राज ठाकरे यांनी आपल्या फेसबूक पोस्टद्वारे नरेंद्र मोदिंविरोधात ममता बॅनर्जींना आपला पाठींबा जाहीर केला आहे. 

राज्य सरकारला विश्वासात न घेता, सीबीआयने कोलकात्याच्या पोलीस आयुक्तांच्या घरावर छापेमारी केली, असंही राज ठाकरेंनी या पोस्टमध्ये म्हटलं आहे. 

सीबीआयची स्वायत्तता संपुष्टात यावी यासाठी अलोक वर्मा प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जे जे प्रकार केले ते देशाने पहिले आहेत, अशी टिकाही राज यांनी केली आहे.

दरम्यान, आपला देश संघराज्य आहे आणि राज्यांच्या अधिकारांवर घाला घालण्याचा कोणताही अधिकार केंद्र सरकारला नाही हे भाजप सरकारने विसरू नये, असंही त्यांनी बजावून सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-कुत्रा-मांजर नव्हे, जंगलाचे राजे आहेत नरेंद्र मोदी- देवेंद्र फडणवीस

ट्रॅकच्या मधोमध थांबले अन् लोकलला साडी अडकल्यानं 3 जीव गेले

-बळीराजाच्या पोरींचं पुणतांब्यात आंदोलन, आजपासून करणार अन्नत्याग

“विरोधी पक्षातील निम्मे आमदार ‘पागल’ होणार”

-“निवडणुकीचं चिन्ह लवकरच सांगतो”, अजूनही सुजय विखेंचं तळ्यात मळ्यात?

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या