मुंबई | शरद पवार यांचं व्यंगचित्र काढू नये यासाठी आपल्या थेट संपादकांचा फोन आला होता. यासंदर्भातील किस्सा मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सांगितला. ठाण्यात आयोजित मटा कलासंगम कार्यक्रमात आयोजित मुलाखतीत ते बोलत होते.
१९८६ साली शरद पवार साहेब पुन्हा काँग्रेसमध्ये आले. त्यावेळी एका वर्तमानपत्रात माझं व्यंगचित्र दिवसाआड छापलं जायचं. १९८८ साली शरद पवार मुख्यमंत्री झाले, मी त्यावेळी एक व्यंगचित्र काढलं, ते छापलं गेलं. आता ते मुख्यमंत्री होते, त्यामुळे त्यांच्यावर व्यंगचित्र काढणारच होतो. त्यानंतर मी पुन्हा एक व्यंगचित्र शरद पवार यांच्यावर काढलं, संपादकांकडे ते घेऊन गेलो. त्यांनी सांगितलं,
“राज यापुढे शरद पवारांवर व्यंगचित्र काढायचं नाही”. तो माझा त्या वर्तमानपत्रातला शेवटचा दिवस होता, असं राज ठाकरे यांनी यावेळी सांगितलं.
दरम्यान, राज ठाकरे यांनी या मुलाखतीत राजकीय मुद्द्यांसह विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. महाराष्ट्रातलं सध्याचं राजकीय वातावरण दुर्देवी असल्याचं ते म्हणाले.
ट्रेंडिंग बातम्या-
“सत्तेचा फेविकॉल इतका पक्का आहे की संध्याकाळी नाराजी दूर होईल”
दिल्लीत हवं तसं घडलं नाही म्हणून भाजपने दंगल भडकवली- शरद पवार
महत्वाच्या बातम्या-
कार्टुन काढण्यासाठी राहुल गांधींचा चेहरा चांगला नाही- राज ठाकरे
ज्यांच्या कमी जागा ते सत्तेत अन् ज्यांच्या जास्त जागा ते विरोधी पक्षात- राज ठाकरे
विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात झालेलं राजकारण अत्यंत दुर्दैवी- राज ठाकरे
Comments are closed.