बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

बाबासाहेबांना जेव्हा जेव्हा भेटतो, तेव्हा इतिहासाचा नव्याने साक्षात्कार होतो- राज ठाकरे

पुणे | शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आज शंभराव्या वर्षात पदार्पण करत आहेत. त्यानिमित्ताने पुण्याच्या कात्रजमध्ये एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थिती लावली.

राज ठाकरे यांनी बाबासाहेबांची भेट घेऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर राज यांनी पत्रकार परिषद घेऊन हे गौरवोद्गार काढले. बाबासाहेबांना जेव्हा जेव्हा भेटतो, तेव्हा इतिहासाचा नव्याने साक्षात्कार होतो, असं राज ठाकरेंनी म्हटलंय.

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी वयाची शंभरी गाठली आहे. पण, त्यांच्यात काहीच फरक पडलेला नाही. त्यांच्या चेहऱ्यावर तेज तसंच आहे. वयामुळे शरीर थोडसं थकलंय. पण त्यांचं बोलणं, स्मरणशक्ती आणि संदर्भ देण्याची हातोटी यात काहीही फरक पडलेला नाही, असं राज ठाकरे म्हणालेत.

दरम्यान, शिवचरित्रं अनेकांनी लिहिली. पण त्या शिवचरित्रातून समाजानं कसं राहिलं पाहिजे, वागलं पाहिजे, कसं सावध असलं पाहिजे, या गोष्टी बाबासाहेबांकडून ऐकायला मिळायला त्या विलक्षण आहेत. आजच्या जगात महाराज आपल्याला काय सांगतात हे बाबासाहेब आपल्याला सतत सांगत असतात. तिच नवीन गोष्ट आणि अनोखी गोष्ट मला बाबासाहेबांमध्ये दिसून आली, असं राज ठाकरे म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

प्रशांत बंब यांची मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी आर्त हाक, दीड वर्षापासून भेटीसाठी प्रतिक्षेत!

…म्हणून मी रॅली काढून पूरग्रस्तांसाठी मदत गोळा करतीये- पंकजा मुंडे

ठाकरे सरकारची बदनामी केल्यानं एसटी कर्मचाऱ्याचं निलबंन!

मोठी बातमी! कृष्णेची पाणी पातळी वाढणार; पुढील आठवड्यात मोठ्या पावसाचा अंदाज

एकेकाळी काम मागण्यासाठी अंधेरीत दिवस-रात्र फिरायचो आता…- पंकज त्रिपाठी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More