मुंबई | माझं नागरिकत्व कायद्याला समर्थन नाही तर खुसखोर पाकिस्तानी आणि बांगलादेशींना समर्थन देणाऱ्या मोर्चाच्या विरोधात हा मोर्चा असल्याचं राज ठाकरेंनी स्पष्ट केलं आहे.
राज ठाकरे यांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली. या बैठकीत राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांच्या शंकेचे निरसन केलं. मनसेचा मोर्चा हा सीएएच्या समर्थनार्थ नाही. तर घुसखोर पाकिस्तानी आणि बांगलादेशींना समर्थन देणाऱ्या मोर्चाच्या विरोधात हा मोर्चा आहे, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
राज ठाकरे यांनी ‘कृष्णकुंज’ या निवासस्थानी मनसेच्या नेते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. सीएए आणि एनआरसीला पाठिंबा देण्यावरुन मनसे पदाधिकाऱ्यांमध्ये गोंधळ आहे. त्यासंदर्भातच पदाधिकाऱ्यांच्या शंकांचं निरसन करण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली होती.
दरम्यान, सीएए आणि एनआरसीबाबत चर्चा होऊ शकतो. मात्र समर्थन नाही, असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे.
बांगलादेश आणि पाकिस्तानी घुसखोर मुसलमानांना देशाबाहेर हाकलून द्यावं ह्यासाठी येत्या ९ फेब्रुवारीला मुंबईत महाराष्ट्र नवनिर्माण सेने मोर्चा काढणार आहे. सीएए आणि एनआरसी विरोधात निघणाऱ्या मोर्च्यांना उत्तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना मोर्च्याने देणार आहे #महाअधिवेशन #RajThackeray
— MNS Adhikrut (@mnsadhikrut) January 23, 2020
ट्रेंडिंग बातम्या-
‘बँक फोडून टाकेन’; नवनीत राणांना संताप अनावर
कोरेगाव भीमा प्रकरणी देवेंद्र फडणवीसांची चौकशी करा; याचिका दाखल
महत्वाच्या बातम्या-
कुणाचीही चौकशी करा, आम्ही नाही घाबरत जा- चंद्रकांत पाटील
“गडकरीजी…आपण एका गाडीत बसलो नाही तरी एकाच स्टेशनवर एकत्र आलो”
अजित पवार मुख्यमंत्री असल्यासारखे वागतात; चंद्रकांत पाटलांचं टीकास्त्र
Comments are closed.