बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘…त्यालाच तिकीट मिळणार’; राज ठाकरेंनी घेतली पदाधिकाऱ्यांची शाळा

पुणे | आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आज पुण्यातील मनसे शाखाध्यक्षांचा मेळावा घेतला. या मेळाव्यात शाखाध्यक्ष झालात म्हणजे तिकीट मिळालं असं नाही, जो चांगलं काम करेल त्यालाच तिकीट मिळणार, असं राज ठाकरे म्हणालेत.

राज ठाकरे यांनी शाखाध्यक्षांचा प्रत्येक महिन्याचा कामाचा अहवाल मागवला आहे. चांगली प्रतिमा ठेवा आणि लोकांमध्ये जावा, अशा सूचना राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी शाखाध्यक्षांचा मेळावा घेतला.

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी शाखाध्यक्षांची शाळा घेतली असल्याची माहिती आहे. शाखाध्यक्ष झालात म्हणजे तिकीट मिळालं असं नाही, जो चांगलं काम करेल त्यालाच तिकीट मिळणार, असं राज ठाकरे यांनी सांगितलं आहे

दरम्यान, सरकारचे त्या त्या पक्षाचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. तिकडे गर्दी चालते. फक्त दहीहंडी आणि गणेशोत्सवाला गर्दी चालत नाही. नियम असेल तर तो सर्वांना सारखा हवा. तुमच्या पक्षांच्या कार्यक्रमाला गर्दी चालणार. फक्त गणेशोत्सवाला नको. ही कोणती पद्धत?, असा सवाल करतानाच गणेशोत्सव कसा साजरा करायचा हे मंडळ ठरवतील. गणेशोत्सव मंडळांशी बोलून चर्चा करू, असंही राज ठाकरे यावेळी म्हणालेत.

थोडक्यात बातम्या- 

पुढील पाच दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता, ‘या’ भागात ऑरेंज अलर्ट जारी

“मंत्र्यांना गाड्या घ्यायला पैसै आहेत, पण पुरग्रस्तांना मदत करण्यासाठी नाहीत”

“RSS राष्ट्रीय बाण्याची संघटना, तालिबानशी तुलना आम्हाला मान्य नाही”

…नाहीतर कोरोनाच्या संकटातून आपण कधीच बाहेर पडणार नाही- उद्धव ठाकरे

नरेंद्र मोदी हे आरएसएसचे प्रचारक आहेत- नाना पटोले

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More