बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

एकनाथ खडसे कधी सीडी बाहेर काढतायत, याची मी वाट पाहतोय- राज ठाकरे

पुणे | राज ठाकरे हे दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर असून त्यांच्या हस्ते रविवारी मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन पार पडलं. यावेळी राज ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना ‘ईडी’च्या कारवाईवर तोफ डागत अप्रत्यक्षपणे भाजपवर निशाणा साधला आहे.

राज्यात केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर होत आहे. यापूर्वी काँग्रेसची सत्ता असतानाही तेच झाले होते आणि आता भाजपही तेच करत आहे. ईडीसारखी सरकारी यंत्रणा ही सरकारच्या हातातलं बाहुलं झालंय. त्यामुळे खरे गुन्हेगार मोकाट राहतात, अशी टीका राज ठाकरे यांनी केली आहे.

माझ्यामागे ‘ईडी’ लावली तर मी सीडी बाहेर काढेन, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी म्हटलं होतं. त्यामुळे मी आता एकनाथ खडसे सीडी कधी बाहेर काढतात, याची वाट पाहत असल्याचंही राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, पुणे महापालिका निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही जोमाने कामाला लागली आहे. पुणे महापालिका निवडणुकीसाठी खुद्द पक्षाध्यक्ष राज ठाकरे मैदानात उतरले असून आजपासून दोन दिवस ते पुण्यात मुक्कामाला असणार आहेत. आज आणि उद्या ते पुण्यात मुक्कामी आहेत. त्याचसोबत मनसेच्या काही प्रमुख नेत्यांसोबत राज ठाकरे बैठक घेणार आहेत.

थोडक्यात बातम्या- 

महापालिका निवडणुकांसाठी मनसेच्या मोर्चेबांधणीला सुरुवात; राज ठाकरे दोन दिवस पुण्यात मुक्कामी

विधानसभा अध्यक्षपदाबाबत शरद पवारांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

कडक लॉकडाऊन करा किंवा निर्बंध पूर्णतः काढा- राजेश टोपे

आईच्या डोळ्यातल्या पाण्यानं चोरालाही फुटला पाझर, चोरलेलं बाळ परत आणून दिलं

‘लंडनमध्ये मी स्वातंत्र्याचा अनुभव घेते आहे’; सोनम कपूर सोशल मीडियावर झाली ट्रोल

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More