महाराष्ट्र मुंबई

शेतकरी आंदोलनावरून राज ठाकरेंनी मोदी सरकारला फटकारलं, म्हणाले…

मुंबई | कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर गेल्या दोन महिन्यांपासून शेतकरी आंदोलन सुरू आहे. यावर प्रतिक्रिया देत मनसे प्रमुख राज ठाकरेंनी मोदी सरकारवर सडकून टीका केली आहे.

चीनच्या आणि पाकिस्तानच्या सीमेवरही मी इतका बंदोबस्त बघितला नाही. इतका बंदोबस्त शेतकऱ्यांसाठी करण्याची आवश्यकता नाही, असं राज ठाकरे म्हणाले.

मला असं वाटतंय हे फार चिघळलं आहे. आम्ही सगळं पाहत आहोत. सरकारनं जो कायदा आणला आहे, तो कायदा चुकीचा नाही. पण, केंद्राने राज्यांचा विचार करून, राज्यांशी चर्चा करून याची अंमलबजावणी केली पाहिजे, असं राज ठाकरे म्हणाले.

प्रत्येक राज्याची कृषी धोरणं वेगळी आहे. प्रत्येक राज्याच्या कृषी मंत्री आणि मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घ्यायला पाहिजे होतं. हे प्रकरण इतकं चिघळायची गरज नव्हती, असंही राज ठाकरेंनी म्हटलंय.

थोडक्यात बातम्या-

‘ती’ व्यक्ती पवारांना भेटल्यानंतर वीजबिल माफीचा निर्णय मागे; राज ठाकरेंचा गौप्यस्फोट

‘या’ लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेत्याच्या आत्महत्येनं खळबळ

इथं कुणीच मास्क घातलेलं दिसत नाही, बाबांनो… अजित पवारांचा कार्यकर्त्यांना सल्ला

शेतकरी आंदोलनावर मौन बाळगणाऱ्या बॉलिवूडकरांना नसीरूद्दीन शाहांनी झापलं, म्हणाले…

सचिन तेंडुलकरचा फोटो जाळणं हा राष्ट्रद्रोह- नारायण राणे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या