महाराष्ट्र मुंबई

वीज बिल भरू नका, राज ठाकरेंचं जनतेला पत्राद्वारे आवाहन

मुंबई | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जनतेला वीज बिल भरू नका असं आवाहन केलं आहे. जर वीज कनेक्शन कापायला कोणी आलं तर संघर्ष हा महाराष्ट्र सैनिकांसोबत होणार आहे, असंही राज ठाकरे यांनी सांगितलं आहे.

वीज बिल भरु नका, असं आवाहन राज ठाकरे यांनी पत्राद्वारे महाराष्ट्राला केलं आहे, असं मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. तसेच हे पत्र मनसे पदाधिकाऱ्यांनी नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिलं आहे.

वीज बिल भरलं नाही म्हणून वीज कनेक्शन कापायला कोणी आलं, तर त्यांच्या कानाखाली इलेक्ट्रिक शॉक काढायला महाराष्ट्र सैनिक तयार आहेत, असं मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे, नागपूर, औरंगाबादेत मनसेने वाढीव वीज बिलांविरोधा एल्गार पुकारला आहे.

महत्वाच्या बातम्या

एक देश आणि एक निवडणूक ही भारताची गरज, राष्ट्राच्या हितात राजकारण नको- नरेंद्र मोदी 

पुण्यात मेट्रोच्या खोदकामादरम्यान सापडले मोठे हाडांचे अवशेष

दौऱ्यावर गेलेल्या 6 पाकिस्तानी खेळाडूंचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह!

“सरकारने एमएमआरडीएचे टॉप सिक्युरिटीमधील 100 कोटी रुपये ढापले” 

आम्ही सुपारी घेणारे, मग तुम्ही हप्ते घेणारे आहात का?; मनसेचा शिवसेनेला सवाल

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या