मुंबई | कॉलेजमध्ये असताना माझं स्वप्न होतं की छत्रपती शिवाजी महाराजांवर एखादा चित्रपट काढणं. पण काही वर्षांनी मला कळालं की फक्त तीन तासांत आपण महाराजांचं व्यक्तिमत्व दाखवू शकत नाही, असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितलं आहे. ते मुंबईमध्ये एका मुलाखतीमध्ये बोलत होते. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं.
शिवाजी महाराजांवर चित्रपट काढायचा म्हणून मी महाराज वाचायला घेतले. महाराजांवरची मी खूप पुस्तकं वाचली. आणि सगळी पुस्तकं वाचल्यानंतर माझ्या लक्षात आलं की महाराजांवरती चित्रपट होऊ शकत नाही, असं राज ठाकरे म्हणाले आहेत.
कॉलेजमध्ये असल्यापासून माझं पहिलं करिअरबाबतीत प्रेम होतं चित्रपट निर्मिती आणि चित्रपट दिग्दर्शन याकडे माझा कल होता, असंही राज ठाकरेंनी सांगितलं आहे.
दरम्यान, मी अॅनिमेशन क्षेत्राकडे जाऊन अॅनिमॅटर व्हावं, असं माझं स्वप्न होतं. पण त्यावेळी आजच्या सारखी माध्यमं नव्हती. यासंबंधी कुणाला पत्र लिहावी. कुणाला याबाबत विचारावं, असं राज ठाकरेंनी यावेळी सागितंल.
ट्रेंडिंग बातम्या-
विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात झालेलं राजकारण अत्यंत दुर्दैवी- राज ठाकरे
अपघाताने की ठरवून राजकारणात आलात?; राज ठाकरेंनी दिलं ‘हे’ उत्तर
महत्वाच्या बातम्या-
…यापुढे शरद पवारांचं व्यंगचित्र काढू नकोस; राज ठाकरेंनी सांगितला ‘तो’ किस्सा
कार्टुन काढण्यासाठी राहुल गांधींचा चेहरा चांगला नाही- राज ठाकरे
ज्यांच्या कमी जागा ते सत्तेत अन् ज्यांच्या जास्त जागा ते विरोधी पक्षात- राज ठाकरे
Comments are closed.