बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अण्णा हजारेंच्या ‘जेलभरो आंदोलना’वर राज ठाकरेंची एका शब्दात प्रतिक्रिया; म्हणाले…

मुंबई | राज्यभर कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचं आकडेवारीवरून दिसत आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने राज्यातील निर्बंध शिथिल केले आहेत. मात्र अद्यापही मंदिरे उघडण्यासाठी परवानगी दिली नाही. यावरून विरोधी पक्षाने राज्यभर आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यासोबतच ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीही  आंदोलनाचा इशारा दिला आहे.

अण्णा हजारेंनी सरकारला दिलेल्या जेलभरो आंदोलनाला भाजपने पाठींबा दिला आहे. भाजपने केलेल्या आंदोलनाच्या दबावामुळे सरकार संध्याकाळपर्यंत मंदिरं उघडण्याचे आदेश देईल, असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं होतं. अशातच यावर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया देताना अण्णांना टोला हाणला आहे.

अण्णा होते कुठे इतके दिवस?, अशा मोजक्यात शब्दात अण्णा हजारेंना राज ठाकरेंनी टोला हाणला आहे. अण्णा हजारे निर्भीड व्यक्तिमत्त्व आहेत त्यांच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे. त्यांनी इच्छा व्यक्त केली तर आम्हीही त्यांच्या आंदोलनात सहभागी होत असल्याचं चंद्रकांत पाटील म्हणाले होते.

दरम्यान, राज ठाकरे यांनी अण्णा हजारेंवर केलेल्या उपरोधिक टीकेवर अण्णा काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

ॲाडी कारला भीषण अपघात, आमदाराच्या मुलासह 7 जणांचा मृत्यू

‘काही पक्षांना जनतेमध्ये बेस नाही म्हणून…’; राऊतांचा मनसेवर निशाणा

‘बाहेर पडायला तुमची फाटते, त्यात आमचा काय दोष?’; राज ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना टोला

बीड जिल्ह्यात पावसाची जोरदार हजेरी; कुंडलिका नदीला पूर

श्रीलंकेच्या ‘या’ गाण्याने घातली भारतीयांना भुरळ; सोशल मीडियावर रिल्सचा धुमाकूळ

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More