औरंगाबाद | शिवसेनेनं औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्याची मागणी केला होती. आता हीच मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेेनेनं केली आहे. सध्या औरंगाबाद दौऱ्यावर असलेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी यावर भाष्य केलं आहे.
औरंगाबादचं नाव संभाजीनगर होतं असेल तर यात वावगं काय?, चांगल्या गोष्टींसाठी बदल हे अनेकवेळा आवश्यक असतात. मी पक्षाचा झेंडा बदलला आहे, पक्षाची भूमिका तीच असल्याचं राज ठाकरेंनी म्हटलं आहे.
काही लोकांनी आपल्या भूमिका बदलल्या आणि सत्तेत आले. त्यांना जाब विचारण्याची कोणाची हिमत्त नाही, असं म्हणत राज ठाकरेंनी शिवसेनेवर निशाणा साधला.
दरम्यान, मराठीला नख लावाल तर मराठी म्हणून अंगावर येईन, धर्माकडं वाकडं बघाल तर हिंदू म्हणून समोर येईन, असं पुन्हा एकदा ठाकरेंनी ठणकावून सांगितलं.
ट्रेंडिंग बातम्या-
चिमुरडी कोल्हेंना म्हणाली, ‘बाहेर जाऊ नका ते तुम्हाला पकडतील’…
मुंबईच्या डबेवाल्यांना हक्काची घरं मिळणार- अजित पवार
महत्वाच्या बातम्या-
“सुट्ट्यांच्या बाबतीत समान नागरी कायदा असावा असं कुणाला का वाटू नये”
मी पहिल्यांदा भारतीय नागरीक नंतर गायक- अदनान सामी
सोनिया गांधींना लिहलेल्या ‘त्या’ पत्रावर अशोक चव्हाण म्हणतात…
Comments are closed.