बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“बाबासाहेब पुरंदरे म्हणजे इतिहासाबरोबर वर्तमानाची जाग आणणारा एक महापुरूष”

मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी इतिहासकार बाबासाहेब पुरंदरे यांचं कौतुक केलं आहे. राज ठाकरे यांनी पुरंदरेंना इतिहासाबरोबर वर्तमानाची जाग आणणारा महापुरूष असल्याचं म्हटलं आहे. बाबासाहेब पुरंदरे यांच्या ‘ओंजळ’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यावेळी बोलत होते. पुण्यातील शिवसृष्टीमध्ये कार्यक्रम आयोजित केला होता.

मला शिवचरित्रातील सर्वात आवडणारी गोष्ट म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहेत. मात्र बाबासाहेब पुरंदरे ज्याप्रकारे सांगतात आणि लिहितात त्यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते इतिहास जरी सांगत असले तरी ते वर्तमानात आपण कसं भानावर येतात हे सांगत असल्याचं राज ठाकरे म्हणाले.

इतिहासात झालेल्या गोष्टी आपण विसरलो नतर नाही ना?, ज्या झाल्या आहेत त्या सुधारून घ्याव्यात आणि इतिहासात झालेल्या पुन्हा होऊ नयेत हे बाबासाहेब पुरंदरे सांगतात. इतिहास ऐकताना जसा स्क्रू फीट व्हावा तसा तो इतिहासातील प्रलसंग फीट होतो. त्यामुळे इतिहासाबरोबर वर्तमानाची जाग आणणारा हा एक महापुरूष आहे, अशा शब्दात राज ठाकरेंनी कौतुक केलं आहे.

दरम्यान, बाबासाहेबांच्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाला आशा भोसलेही उपस्थित होत्या. राज ठाकरे यांनी बोलताना, बाबासाहेब आणि आशाताई यांच्या वयाचे फक्त आकडे मोजायचे बाकी यापलीकडे काही नाही. त्यासोबतच मला जे प्रश्न पडले आहेत मी त्यांना विचारून घेतले असल्याचं सांगितलं.

थोडक्यात बातम्या-

अनिल कपूरच्या घरी लगीनघाई; मुलीच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू

राहुल गांधींना ट्विटरकडून दिलासा; आठवड्याभरानंतर अकाऊंट अनलाॅक

अभिनेत्री उर्मिला मातोंडकरांची होणार चौकशी; कोरोना नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप

‘शिवसेनेच्या दहशतीमुळेच…’; केंद्रीय मंत्री नितीन गडकरीचं थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र

कोरोना लसीचा बूस्टर डोस ठरणार ‘या’ रुग्णांसाठी फायदेशीर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More