बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राज ठाकरेंची महाराष्ट्र सैनिकांना साद; म्हणतात…

मुंबई| देशात तसंच राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. राज्यातील कोरोना रूग्णांची संख्या 49 वर जाऊन पोहोचली असून देशातील कोरोनाबाधित रूग्णांचा आकडा 170हून अधिक आहे. सगळीकडं भीतीचं वातावरण आहे. याच पार्श्वभूमीवर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी काही सुचना केल्या आहेत.

माझ्या महाराष्ट्र सैनिकांनो… असं म्हणत राज ठाकरे यांनी कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी जनतेला काही सूचना केल्या आहेत. कोरोना एकमेकांच्या सहवासामुळं होतो यावर आळा घालण्यासाठी आपण एकमेकांना न भेटता घरात बसायला हवं आपण सर्वांनी योग्य ती खबरदारी घेतली तर या विषाणूचा फैलाव हणार नाही, असं राज ठाकरे यांनी सांगितलं.

-आपल्या शाखा-शाखांमध्ये किंवा कार्यालयांमध्ये आपण एका वेळी गर्दी होणार नाही हे पहावं. ती थोडी नियंत्रित करून, काहींना वेग-वेगळ्या वेळा देऊन गर्दी आटोक्यात आणावी. आपल्यामध्ये तीन फुटांचे अंतर राखावे.

-आपल्या भागात जर कुणी सर्दी, तापानं आजारी असेल तर त्यांना धीर देऊन तपासणी करून घ्यायला सांगावे. त्यासाठी कुठलीही जोर-जबरदस्ती करू नये. त्यांचं मन तयार करावं आणि त्यांना आपल्या भागातील आरोग्य खात्याच्या कर्मचारी वर्गाशी भेट घालून द्यावी.

-आपल्या भागात जीवनावश्यक गोष्टींचा तुटवडा असल्यास तशी माहिती योग्य यंत्रणेला द्यावी. दुकानांमध्ये माल आहे की नाही ते पहावे. कुणी काळाबाजार करत असेल तर त्याची माहिती शासनाला द्यावी आणि लक्ष ठेवावे.

-महिला सेनेनी घराघरात जाऊन महिलांच्या आरोग्यविषयक किंवा काही अडचणी असतील तर त्या ऐकाव्यात. महिला सर्वसाधारणपणे बोलत नाहीत. त्यांचं ऐकावं आणि योग्य ती मदत करावी, असं आवाहन राज ठाकरे यांनी मनसैनिकांना केलं आहे.

– ज्यांचं हातावर पोट आहे अशी माणसं आपल्या भागात असतील. ती कोण आहेत ती शोधून त्यांची खाण्याची सोय नसेल तर ती करण्याचा प्रयत्न करावा. आपल्या भागात काही जेष्ठ नागरिक, अपंग, इतर रूग्ण असतील तर त्यांना काही मदत लागल्यास ती देण्याचा प्रयत्न करावा.

-आपल्या शाखा-शाखांमध्ये किंवा कार्यालयांमध्ये आपण एका वेळी गर्दी होणार नाही असे पहावे. ती थोडी नियंत्रित करून, काहींना वेग-वेगळ्या वेळा देऊन गर्दी आटोक्यात आणावी. आपल्यामध्ये तीन फुटांचे अंतर राखावे.

-आपण ज्या भागात रहातो तिथे लोक गोंधळलेल्या अवस्थेत असू शकतात. तिथे त्यांना दिलासा द्यायला पाहिजे. तिथे माहितीची कमी असेल, साधन-सोयींची कमतरता असेल तर योग्य ते करावे.

ट्रेंडिंग बातम्या-

पंतप्रधानांनी कोरोनाचा सामना करण्यासाठी जी काही गरज पडेल ती पुरविण्याचं वचन दिलंय- उद्धव ठाकरे

आपण जागतिक यु्द्ध लढत आहेत, घाबरून युद्ध जिकंलं जात नाही- उद्धव ठाकरे

महत्वाच्या बातम्या-

उद्धवा, ‘पक्षपाती’ तुझे सरकार! कोरोनासंदर्भातील शासननिर्णय न मिळाल्यानं मनसेची मुख्यमंत्र्यांवर टीका

देवेंद्र फडणवीस असते तर महाराष्ट्रात आज गावोगावी तिरड्या उठल्या असत्या; राष्ट्रवादीची टीका

मेडिकल यंत्रणा जवानांप्रमाणे लढतेय, त्यांच्यावर ताण आणू नका- उद्धव ठाकरे

 

 

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More