राष्ट्रवादीच्या जन्मानंतर महाराष्ट्रात जातीपातीचा मुद्दा मोठा झाला- राज ठाकरे
मुंबई | राज्यात सध्या आरक्षणावरून विरोधी आणि सत्ताधाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात संघर्ष चालू आहे. अशातच यावर बोलताना मनसे नेते राज ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्रात दुसऱ्या जातीबद्दलचा द्वेश वाढत चालला आहे. हे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक चेहऱ्याला डाग लावणारं असल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. एबीपी माझाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
महाराष्ट्र जातीपातीत गुंतत चाललाय. सर्वांनाच जातीचा अभिमान असतो आणि आताही आहे. पण त्यापेक्षा जास्त दुसऱ्याच्या जातीचा द्वेष लोकांच्या मनात निर्माण झालाय. आधीपासून महाराष्ट्रात जातीचा मुद्दा नव्हता याच मुळ कुठे असेल तर ते राष्ट्रवादीच्या जन्मात आहे, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
राष्ट्रवादीच्या जन्मानंतर महाराष्ट्रात जातीपातीचा मुद्दा मोठा झाला. आज मराठा समाजाचं आंदोलन चालू आहे. मी हे आधीच सांगितलं होतं की असलं काही होणार नाही. मराठा समाजाचं आरक्षण सर्वांनाच मान्य आहे तर अडचण काय आहे, हे मी आधीही म्हटलं असल्याचं राज ठाकरे यांनी सांगितलं. यावेळी बोलताना लोकसंख्येबाबतही भाष्य केलं.
दरम्यान, देशातील लोकसंख्या सांगूनही कमी होत नसेल तर यासाठी जनतेला प्रोत्साहन द्यावं लागेल, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
थोडक्यात बातम्या-
“संसदेमध्ये महिला सदस्यांना धक्काबुक्की ही तर ‘गुजरात मॉडेल’ ची प्रतिकृती”
रक्षाबंधनाच्या अगोदर नरेंद्र मोदींनी महिलांना दिलं हे खास गिफ्ट; केली मोठी घोषणा!
“राज्य सरकारच्या सर्कशीतल्या कोलांट उड्यांना जनता त्रासली आहे”
“इंग्रजांनी भारताची लूट केली, त्यांच्यावरचा राग अजूनही डोळ्यात माझ्या सलत आहे”
“घोषणाबहाद्दर विजय वडेट्टीवारांनी राजीनामा द्यावा”
Comments are closed.