मुंबई | दिल्लीतील शेतकरी आंदोलनावर भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि गाणकोकिळा लता मंगेशकर यांनी केलेल्या वक्तव्यामुळे त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपलं मत व्यक्त करताना यासाठी केंद्र सरकारला जबाबदार धरलं आहे.
लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर ही भारतरत्नं आहेत. खूप मोठी माणसं आहेत त्यांना अशा गोष्टी करायला सांगणं. ती साधी माणसं आहेत. सरकारनं त्यांना सांगितलं त्यांनी ट्विट केलं पण आज जे ट्रोल होतंय आज त्यांच्यावरच येत असल्याचं राज ठाकरे म्हणले.
हा काही देशाचा विषय नाही. काही चीनमधून संकट आलंय, पाकिस्तानमधून आलंय शेतकऱ्यांचं संकट आहेच मोठं पण या सर्व गोष्टींसाठी सर्व लोकांना त्या अक्षय कुमारवरती आटपायचा ना विषय, असं म्हणत ठाकरेंनी केंद्र सरकारला टोलाही लगावला.
दरम्यान, अशा प्रकारचं ट्विट करायला सांगणं. एकाच हॅशटॅगवर सगळ्या लोकांची ट्विट येणं ही खूप मोठी माणसं आहेत. त्यांना सरकारने अशा गोष्टींमध्ये पडायला लावू नये, असंही राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर ही कर्तृत्ववान पण साधी माणसं आहेत. एखादं देशांतर्गत आंदोलन चिघळलं म्हणून बाजू सावरून घेण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी भारतरत्नांना ट्विट करायला सांगणं चुकीचं आहे. pic.twitter.com/hoiewAkIi8
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) February 6, 2021
थोडक्यात बातम्या-
धक्कादायक! 27 वर्षीय नौदल जवानाचं अपहरण करून जिवंत जाळलं
“पॉपस्टार रिहानाने सातासमुद्रापलीकडून शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिल्याने काहींना मिरच्या झोंबल्या”
धावत्या ट्रेनमध्ये या मराठी अभिनेत्रीने छैया छैया गाण्यावर धरला ठेका, पाहा व्हिडीओ
‘बिग बॅास’ शो अर्धवट सोडल्यास स्पर्धकाला चुकवावी लागते ‘एवढी’ किंमत