Top News महाराष्ट्र मुंबई

‘हाथरसमधली घटना पाशवी! महाराष्ट्राला जाब विचारणारे आज गप्प का?’; राज ठाकरे कडाडले

मुंबई | उत्तर प्रदेशच्या हाथरसमधली घटना पाशवी, पण अशी घटना महाराष्ट्रात घडली असती तर स्वतःला देशाचा आवाज घोषित करुन अर्वाच्च पद्धतीने ओरडणारे आज गप्प का आहेत?, असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे.

या प्रकऱणात सर्वात भीषण बाब म्हणजे मुलीची मृतदेह घरी न देता त्यांच्या परस्पर त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यामुळे सरकार आणि तेथील प्रशासनाला काय लपवायचं आहे?, असाही सवाल ठाकरे यांनी केला आहे.

दरम्यान,  पीडितेच्या कुटुंबियांना भेटण्यापासून का अडवलं जात आहे, नक्की कशाची भीती सरकारला वाटत आहे, असंही ठाकरेंनी म्हटलं आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

रामाचं नाव घ्यायचं आणि कृती मात्र नथुरामाची करायची ही भाजपची पद्धत- जयंत पाटील

‘…आता तरी चाचण्या वाढवा’; फडणवीसांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र

राहुल गांधींवर बळाचा वापर करणाऱ्या युपी पोलिसांना निलंबित करा- विद्या चव्हाण

“इंदिरा का पोता है, राजीव का बेटा है, न डरेगा और न ही रुकेगा”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या