बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

बाळासाहेबांचा ‘तो’ व्हिडीओ शेअर करत राज ठाकरेंचा शिवसेनेवर हल्लाबोल

मुंबई | मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. मशिदींवरील भोंग्यांबाबत अंतिम निर्णय घेण्यासाठी राज ठाकरेंनी राज्य सरकारला अल्टिमेटम दिल्यापासून मनसे-सेनेत जुंपलेली पाहायला मिळत आहे.

राज ठाकरेंच्या भूमिकेवरून शिवसेनेकडून (Shivsena) सातत्याने टीका करण्यात येत आहे. त्यानंतर आता राज ठाकरेंनी शिवसेना पक्षप्रमुख हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचा एक जूना व्हिडीओ शेअर करत शिवसेनेला डिवचलं आहे.

राज ठाकरेंनी ट्विट केलेल्या या व्हिडीओत बाळासाहेब लाऊडस्पीकर मशिदींवरून खाली येतील असं म्हणताना दिसत आहेत. ज्या दिवशी महाराष्ट्रात माझं सरकार येईल त्यावेळी रस्त्यावरील नमाज बंद केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. धर्म असा असावा लागतो जो राष्ट्रविकासाच्या आड येता कामा नये. लोकांना त्याचा उपद्रव होता कामा नये, असंही बाळासाहेब म्हटले आहेत.

दरम्यान, आमच्या हिंदू धर्माचा कोणाला उपद्रव होत असेल तर त्याने येऊन आम्हाला सांगावं, आम्ही त्याचा बंदोबस्त करायला तयार आहोत. लाऊडस्पीकर मशिदीवरचे खाली येतील. बंद, असं वक्तव्य बाळासाहेबांनी केलं होतं. बाळासाहेबांच्या या जुन्या व्हिडीओची चर्चा रंगली असताना आता शिवसेना यावर काय प्रतिक्रिया देणार हे बघावं लागेल.

पाहा व्हिडीओ-

 

थोडक्यात बातम्या-

मोठी बातमी! नवनीत राणांची प्रकृती खालावली, महत्त्वाची माहिती समोर

“स्वत:चा भाऊ मुख्यमंत्री झाला म्हणून एवढा द्वेष करणं दुर्दैवी”

‘शत्रुघ्न सिन्हांनी माझं कौमार्य विकून सोनाक्षीला अभिनेत्री बनवलं’, अभिनेत्रीच्या आरोपाने खळबळ

रोगराई, राजकारण, पाऊस…, वाचा काय म्हटलंय भेंडवळच्या भविष्यवाणीत?

“मुख्यमंत्री बेगडी धर्मनिरपेक्षतावादी शरद पवारांचं ऐकणार की बाळासाहेबांचं?”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More