‘त्या’ बैठकीला राज ठाकरेही हजेरी लावणार?, गृहमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) मशिदींवरील भोंग्याच्या मुद्द्यावरून आक्रमक झाल्यानंतर राज्यातील वातावरण चांगलंच तापलेलं पाहायला मिळत आहे. या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात असताना धार्मिक स्थळांवरील भोंग्यांबाबत अंतिम निर्णय घेण्यापूर्वी एक सर्वपक्षीय बैठक पार पडणार आहे.
धार्मिक स्थळावरील भोंग्यांबाबत अंतिम निर्णय घेण्यापूर्वी राज्यातील सर्व प्रमुख नेत्यांची बैठक बोलावून चर्चा करणार असल्याचं गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील (Dilip Walse-Patil) यांनी सांगितलं. तर या बैठकीला राज ठाकरे यांनाही बोलावलं जाईल, अशी माहितीही दिलीप वळसे-पाटील यांनी दिली आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याबाबत सरकार अतिशय गंभीर असल्याचं गृहमंत्री म्हणाले. तर भोंगे लावणे, उतरवणे ही सरकारची जबाबदारी नाही. पोलिसांची परवानगी घेऊनच ते लावायला हवेत, असंही वळसे-पाटील म्हणाले आहेत.
दरम्यान, कायदा हातात घेण्याचा कोणीही प्रयत्न करू नका. संघर्ष वाढवू नका. तेढ निर्माण करू नका, असं आवाहन दिलीप वळसे-पाटील यांनी केलं आहे. तर कोणाकडून जर अशी कृती झाली तर त्याबाबत कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा देखील गृहमंत्र्यांनी दिला आहे.
थोडक्यात बातम्या-
संजय राऊतांचं पंतप्रधान मोदींना आवाहन, म्हणाले…
Netflix ला मोठा झटका! ‘ही’ महत्त्वाची माहिती आली समोर
‘मी एसटी संपकऱ्यांकडून पैसे घेतल्याचं मान्य करतो’; सदावर्तेंची कबुली
“तुमच्यासारख्या तात्या विंचूचा राजसाहेब ओम फट स्वाहा करणार”
मोठी बातमी ! ‘या’ प्रसिद्ध दिग्दर्शकाचं निधन, वयाच्या 84 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Comments are closed.